Saturday, July 27, 2024

Latest Posts

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक

संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना, सुरक्षेत मोठी चूक (Security Breach) झाल्याचं समोर आलं आहे. कारण प्रेक्षत गॅलरीत (Audience Gallery) बसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेत (Lok Sabha) हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे कलर स्प्रे (Color Spray) असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आलं.या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती एका खासदाराने दिली. तसेच, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला खासदार मनोज कोटक यांनी पकडलं आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिलं आहे.

लोकसभेत नेमकं काय घडलं?
संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे लोकसभेचं कामकाज सुरु होते. प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहात होते. अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. या गर्दीत तीन जण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली जिथे सर्व खासदार बसून कामकाज करत असतात, तिथे उडी मारली. त्यांच्याकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती.

लक्ष वेधण्यासाठी स्मोक कँडल
दरम्यान, ज्या व्यक्तीनं गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले.

संसदेबाहेर दोघांचं आंदोलन, महाराष्ट्रातील तरुण ताब्यात
संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या. तसेच, दोघांनीही घोषणाबाजीही केली. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे. 25 वर्षांचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर लोकसभेबाहेर गोंधळ घालणारी 42 वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss