Tuesday, June 18, 2024

Latest Posts

Earthquake In Turkey, ७. ९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

आज तुर्कीत सर्वात मोठा शक्तीशाली भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल ७. ९ तीव्रतेचा हा भूकंप होता अशी माहिती समोर येत आहे.

Earthquake In Turkey : आज तुर्कीत सर्वात मोठा शक्तीशाली भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल ७. ९ तीव्रतेचा हा भूकंप होता अशी माहिती समोर येत आहे. तसेच या भूकंपामुळे तुर्कीत मोठ्या प्रमाणात नुकसान हे झाल्यचे समोर येत आहे. तुर्कस्तानमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७. ९ इतकी होती. दक्षिण पूर्व तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे आहे. या भूकंपामुळे येथील अनेक इमारती कोसळल्या आहेत. एवढेच नाही तर आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. दुसरीकडे, सीरियामध्येही भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या.

स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी भूकंप झाला. त्याची खोली जमिनीच्या आत १७. ९ किलोमीटर होती. तुर्कस्तानच्या गझियानटेपजवळ भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तुर्कीच्या उस्मानियामध्ये ३४ इमारती उद्ध्वस्त झाल्या. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रजब तय्यब एर्दुगन यांनी ट्विट करून भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले. भूकंपाच्या वेळी किमान ६ आफ्टरशॉक बसले होते. एर्दुगन यांनी लोकांना नुकसान झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन केले.

सीरियातील लेबनॉनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. सीरियातील अलेप्पो आणि हमा शहरातून नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सिव्हिल डिफेन्सच्या म्हणण्यानुसार, सीरियामध्ये तुर्कीच्या सीमेला लागून असलेल्या भागात अनेक इमारती कोसळल्या. दमास्कसमध्येही भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक रस्त्यावर उतरले. लेबनॉनमध्ये सुमारे ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कस्तानच्या भौगोलिक स्थितीमुळे येथे अनेकदा भूकंप होतात. १९९९ पासून आतापर्यंत १८००० लोकांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : 

एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान म्हणाले, माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले….

एकनाथ खडसेंच खळबळजनक विधान म्हणाले, माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss