Mumbai City जिल्ह्यातील दोन्ही Loksabha मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

Mumbai City जिल्ह्यातील दोन्ही Loksabha मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे, असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे.

३ मे २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे (Nomination letters) उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल. ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देश पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्रमांक, २०५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील. तसेच ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, पहिला मजला, कक्ष क्रमांक १३२, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील. ४ मे २०२४ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. ६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे: 

Exit mobile version