spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

Loksabha Elections साठी ‘या’ वेबसाईटवरून मिळवा तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराची माहिती

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार त्यांच्या लोकसभा मतदार क्षेत्रातील उमेदवाराची माहिती आता नागरिकांना जाणून घेता येणार आहे. त्यामुळे मतदानाच्या पाचव्या टप्प्यात नागरिकांना उमेदवाराची माहिती मिळणे शक्य होणार आहे. भारत निवडणूक आयोग अर्थात  Election Commission of India (eci.gov.in) अथवा या लिंकवर तुम्हाला उमेदवाराबाबत माहिती मिळेल अथवा ‘नो युवर कॅन्डीडेट’ (Know Your Candidate) या ॲपवर माहिती मिळेल. २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २७-मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात २१ उमेदवार, २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदरसंघात २० उमेदवार, २९- उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय, ३०-दक्षिण मध्य मुंबईत १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवर कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी नसल्यास दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. सुट्टी अथवा सवलत न दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली आहे. मतदारांना मतदान सहजतेने करता यावे यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. त्याठिकाणी  पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, शौचालये, एकाच ठिकाणी अनेक केंद्रे असल्यास मतदान चिठ्ठीवर विविध रंगांचा वापर करण्यात येणार आहे. जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांग असणार आहे. अंध दिव्यांगांसाठी ईव्हीएम मशीनसाठी ब्रेल लिपी आणि वरिष्ठ नागरिकांना व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांक

सामान्य चौकशीसाठी १९५० क्रमांकावर संपर्क साधू शकणार आहेत. तसेच, आपल्या क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत ही आपण मतदानासंदर्भात असलेल्या समस्यांबाबत माहिती घेऊ शकतील. सक्षम ॲप (Saksham App) दिव्यांग उमेदवारांना उपलब्ध होणाऱ्या सुविधांबाबत आहेत. तसेच, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे आढल्यास सि-व्हीजील ॲपवर (C Vigil App) तक्रारी दाखल करता येऊ शकतात.

हे ही वाचा:

४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाहीत, Mallikarjun Kharge यांचा दावा

loksabha election 4th phase voting: महाराष्ट्रात १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान,नंदुरबार मध्ये सर्वांधिक मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss