Saturday, July 27, 2024

Latest Posts

कशी होणार अयोध्यातील राममंदिरांच्या पुजाऱ्यांची नियुक्ती ?

दिरात रामललाची पूजा करण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर अर्चकांची (पुजारी) निवड केली जात आहे. प्रत्येक मंदिरात दोन पुजारी नियुक्त केले जातील

२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आली आहेत. पण, त्यापूर्वी रामललाची सेवा करण्यासाठी पुजारी नियुक्त करण्यात आले. त्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली. या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून ३००० वेदार्थी आणि पुजारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून काहींची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामाची सेवा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आता निवड झालेल्या अर्चकांना ६ महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार असून प्रशिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल ३ हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी २४ अर्चकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी २१ अर्चकांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितलं की, निवड करण्यात आलेल्या अर्चकांचं प्रशिक्षण अजुनही सुरू आहे. सर्व अर्चकांना सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणानंतर, परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर सर्वात योग्य व्यक्तींची रामललाच्या सेवेसाठी नियुक्ती केली जाईल. सध्या २१ जण केवळ प्रशिक्षणासाठी आले आहेत.

प्रशिक्षणादरम्यान, प्रत्येक उमेदवाराला दरमहा 2,000 रुपये दिले जाणार आहेत.२२ जानेवारी २०२४ रोजी रामललाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अभिषेक झाल्यानंतर श्री रामजन्मभूमी मंदिरातील विधी आणि पूजेचं स्वरूप बदलणार आहे. २२ जानेवारीला रामललाला तात्पुरत्या मंदिरातून भव्य मंदिरात हलवण्यात येणार आहे.

मंदिरात रामललाची पूजा करण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर अर्चकांची (पुजारी) निवड केली जात आहे. प्रत्येक मंदिरात दोन पुजारी नियुक्त केले जातील, जे 8 तासांच्या शिफ्टमध्ये सेवा देतील. याशिवाय भंडारी कोठारी आणि सेवादारही असतील.

रामललाच्या सेवेसाठी मोहित पांडेंची नियुक्ती
मोहित पांडे यांनी गाझियाबाद येथील दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्ष शिक्षण घेतलं आहे. यासोबतच, त्यांनी तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमशी संलग्न असलेल्या श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून शास्त्री पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर २०२३ मध्ये मोहितनं सामवेदाचा अभ्यास करून पदव्युत्तर पदवी मिळवली. ते रामानंदीय परंपरेचेही अभ्यासक आहेत. मोहित पांडे यांचं वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये प्राविण्य आहे. मोहित पांडे यांनी गाझियाबाद येथील दूधेश्वर विद्यापीठातील दूधेश्वर नाथ मठ महादेव मंदिराचे महंत श्री महंत नारायण गिरी महाराज, पंच दशनम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते, दिल्ली संत महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संयुक्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष श्री महंत नारायण गिरी महाराज यांच्या देखरेखीखाली विद्येचं शिक्षण घेतलं आहे.

हे ही वाचा : 

पायल रोहतगीने पठाण चित्रपटाला समर्थन देत सनी लियोनवर साधला निशाणा

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांच वयाच्या ४७ व्या वर्षी झाल हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss