Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

सध्या देशामध्ये अनेक घडामोडी या सुरु आहेत. तर मणिपूरमध्ये हिंसाचाराचे स्तर काही थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.

सध्या देशामध्ये अनेक घडामोडी या सुरु आहेत. तर मणिपूरमध्ये हिंसाचाराचे स्तर काही थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. मंगळवारी दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी रात्री जोरदार गोळीबार झाला. या गोंधळात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी युवा अध्यक्षांसह ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, मंगळवारी (३० जानेवारी) दुपारी २.३० वाजता गोळीबार सुरू झाला आणि जवळपास अनेक तास हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात ठार झालेल्या दोघांची नावे देखील समोर आली आहेत. त्यातील नॉन्गथोम्बम मायकल (वय ३३) आणि मीसनम खाबा (वय २५) अशी आहेत. ३० जानेवारीला सायंकाळी दोघांचे मृतदेह रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नेण्यात आले. तर राज्याच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक गावात हा गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर किमान १ जण बेपत्ता असल्याचीही माहिती मिळाली आहे. या हिंसाचारात मणिपूरमधील भाजपचे युवा अध्यक्ष बारिश शर्मा हेही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मणिपूरमध्ये गेल्या महिनाभरात उसळलेल्या हिंसाचारात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्तपत्रातील अहवालात सांगण्यात आले आहे. हिंसाचारग्रस्त भागात तैनात असलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षी ३ मे २०२२ रोजी राज्यात सुरू झालेल्या हिंसाचारात १८० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि ३००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचारामुळे हजारो लोकही विस्थापित झाले होते, तर राज्यात किमान ६०,००० केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात असूनही ८ महिन्यांहून अधिक काळ हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss