Saturday, March 2, 2024

Latest Posts

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केला मारहाणीचा आरोप

विवेक बिंद्रा हा मोटिव्हेशल स्पीकर आणि युट्यूबर म्हणून तो सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

विवेक बिंद्रा हा मोटिव्हेशल स्पीकर आणि युट्यूबर म्हणून तो सध्या सगळीकडे चर्चेत आहे. विवेक बिंद्रा हा ६ डिसेंबर २०२३ रोजी यानिकासोबत लग्नबंधनात अडकला आहे. त्यानंतर आठ दिवसातच त्याच्या पतीनीने त्याच्या विरोध नोएडा सेक्टर १२६ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानिकाने विवेक मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप महेश्वरी याच्या सोबतच्या वादामुळे चर्चेत आला होता.

यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा म्हणाला, ७ डिसेंबर रोजी विवेक बिंद्रा हा आपल्या राहत्या घरी आईसोबत भांडत होता. त्यावेळी यानिकाने त्या दोघांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विवेकाने यानिकाला एका रूममध्ये बंद करून ठेवले आणि शिव्या घ्याला सुरुवात केली. नंतर त्याने यानिकाला मारहाण केली. यानिकाच्या मारहाणीचे वळ तिच्या अंगावर स्पष्ट दिसत होते. तिला व्यवस्थित ऐकूदेखील येत नाही. दिल्लीतील कैलाश दीपक रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. यानिकाने १४ डिसेंबरला विवेक विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. एका बाजूला विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांचा वाद चर्चेत आहे. विवेकवर ३२३, ५०४, ४२७, ३२५ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास घेत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी संदीप माहेश्वरीने युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दोन मुलं संदीपला सांगत आहेत एका मोठ्या युट्यूबरचा कोर्स खरेदी केला. पण त्याचा काही फायदा झाला नाही. संदीपचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विवेक आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. संदीपने दुसरी बाजू मांडायला हवी होती, असे मत विवेकने मांडले आहे. विवेक बिंद्रा हा एक मोटिवेशनल स्पीकर असून तो उद्योगपतीसुद्धा आहे. तसेच तो लोकप्रिय लेखक, वक्ता आणि व्यवसाय प्रशिक्षक आहे. विविध श्रेणींमध्ये विवेकला ९ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह ११ जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहेत.

हे ही वाचा:

‘आमचं झालंय’, लग्नानंतर मुग्धा- प्रथमेशने शेअर केली खास पोस्ट

शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली जितेंद्र आव्हाडांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss