Wednesday, April 24, 2024

Latest Posts

देशात पेट्रोल-डिझेलचे दर नवे दर जारी

देशामध्ये दररोज देशात पेट्रोल-डिझेलचे दर नवे दर जारी करण्यात आले आहेत. २५ मे रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जरी झाले आहेत. अनेक शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला आहे.

देशामध्ये दररोज देशात पेट्रोल-डिझेलचे दर नवे दर जारी करण्यात आले आहेत. २५ मे रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर जरी झाले आहेत. अनेक शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला आहे. परंतु देशामधील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिरावल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (West Texas Intermediate) कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७४.२० डॉलरवर व्यापार करत आहे. त्यामध्ये ०.१९ टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच ब्रेंट क्रूड ऑईल मध्ये ०.०३ टक्क्यांनी घसरण होईल ७८.३१ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत येत आहे.

देशामधील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये बऱ्याच काळ बदल झालेला नाही.नवी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.२७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. रिपोर्टनुसार देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर आहे तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जात आहे. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११३.३० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचा दर ९८.०७ रुपये प्रति लिटरवर विकला जात आहे.

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर –

 • नागपूर – १०६.०४ रुपये प्रति लिटर
 • पुणे – १०५.८४ रुपये प्रति लिटर
 • मुंबई – १०६.३१ रुपये प्रति लिटर
 • कोल्हापूर – १०६.४७ रुपये प्रति लिटर
 • छत्रपती संभाजीनगर – १०८ रुपये प्रति लिटर
 • परभणी – १०९.४५ रुपये प्रति लिटर
 • नाशिक – १०६.७७ रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रात डिझेलचे दर –

 • नागपूर – ९२.५९ रुपये प्रति लिटर
 • पुणे – ९२.३६ रुपये प्रति लिटर
 • मुंबई – ९४.२७ रुपये प्रति लिटर
 • कोल्हापूर – ९३.०१ रुपये प्रति लिटर
 • छत्रपती संभाजीनगर – ९५.९६ रुपये प्रति लिटर
 • परभणी – ९५.८१ रुपये प्रति लिटर
 • नाशिक – ९३.२७ रुपये प्रति लिटर

Latest Posts

Don't Miss