Tuesday, April 23, 2024

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अबू धाबीतील पहिल्या मंदिराचे उद्घाटन

जगभरातील प्रत्येक देशामध्ये एक तरी हिंदू मंदिर (Hindu Mandir) आहे.

जगभरातील प्रत्येक देशामध्ये एक तरी हिंदू मंदिर (Hindu Mandir) आहे. असेच हिंदू मंदिर आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) बांधण्यात आले आहे. हे संयुक्त अरब अमिरातीमधले पहिले हिंदू मंदिर तयार झाले असून लवकरच याचे उद्घाटन पार पडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी (Hindu Mandir)येथील भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडणार आहे. १४ फेब्रुवारीला २०२४ ला या मंदिराचे उद्दघाटन होणार आहे.

मंदिराच्या उद्घटनासाठी अबू धाबीमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वीच अनेक देशांचे दिग्गज मंत्री या कार्यक्रमासाठी अबूधाबीमध्ये हजर झाले आहेत. या सोहळ्यासाठी अनेक संत, महंत पाहुणे अबुधाबीला पोहोचले आहेत. हे मंदिर २७ एकर जागेत उभारण्यात आले आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एका भव्य मंदिराचे उदघाटन करणार आहेत. अबू धाबीमध्ये बनवण्यात आलेले हिंदू मंदिर हे दगडापासून बनवलेले मध्य पूर्वेतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर आहे.

हे मंदिर बनवण्यासाठी गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे. हे दगड भारतात कोरल्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी अबू धाबीमध्ये नेण्यात आले. अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान मोदीच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३. ५ एकर जमीन दान केली होती.तसेच २०१९ मध्ये मंदिरासाठी आणखी १३. ५ एकर जमीन दान करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २७ एकर जमिनीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.२०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती.मंदिराच्या पायामध्ये १०० सेन्सर बसवण्यात आले आहेत. भूकंपाची शक्यता आणि तापमान बदल तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत.मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाला आहे.

हे ही वाचा: 

घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तयार करा बीटचा रायता

PM Modi यांचा राज्यसभेतून हल्लाबोल, जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की मला आरक्षण आवडत नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss