भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

तुमचे अकाउंट जर भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) असेल आणि भारतीय स्टेट बँकेच्या नावाने जर तुम्हाला अकाउंट संबंधित काही मेसेज येत असेल तर वेळीच सावध राहण्याची गरज आहे. कारण कोणत्याही आलेल्या या लिंकवर क्लिक केल्यास त्यांचा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. असे केल्यास तुमच्या अकाउंटवरून तुमचे सगळे पैसे उडू शकतात. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध रहा आणि त्या मेसेजला रिप्लाय करु नका असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे. जर तुम्ही असे चुकूनही क्लिक केले तर तुमचे अकाउंट तात्पुरते लॉक होऊ शकते. स्कॅम करणाऱ्या फर्जी लोकांपासून हे मेसेज पाठवले जात आहेत. अशा मेसेज वर दुर्लक्ष करा.

सरकारी अधिकृत पीआयबी फॅक्ट चेकने एसबीआयच्या ग्राहकांना अशा मेसेज स्कॅम करणाऱ्यापासून सावध राहायला सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने एक ट्विट केले आहे त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एसबीआयच्या ग्राहकांना एक फसवणुकीचा मेसेज पाठवला जात आहे. त्यावर क्लिक केल्यास तुमचे अकाउंट काही काळापुरते बंद पडू शकते. त्यांनतर पीआयबीने (PIB) सांगितले की, अशा कोणत्याही प्रकारच्या मेसेजला किंवा ईमेलला उत्तर देऊ नये. तसेच आपले बँकेचे डिटेल्स शेअर करू नये. जर अशा प्रकारचा कोणताही मेसेज आल्यास report.phishing@sbi.co.in या साईट वर कळवा.

तुम्हाला जर असे स्कॅम करणारे मेसेज आले तर आणि जर तुम्ही त्याला उत्तर दिले तर तुमच्या बँक खात्यामधून जमा केलेले पैसे गायब होण्याचा धोका वाढेल. असे अनेक भामटे आहेत जे तुमचा वैयक्तिक डेटा चोरून तुमच्या अकाउंटमधून पैसे काढू शकतो. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर तुम्ही चुकूनही क्लिक करू नका.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version