Saturday, July 27, 2024

Latest Posts

लेटेस्ट स्मार्टफोन oneplus 12 ची आजपासून बाजारात विक्री सुरु,बेस्ट फिचर्स,आणि किंमत जाणुन घ्या

OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोनची सेल आज 30 जानेवारीपासून भारतात सुरू झाली आहे

मोबाईल प्रेमी हे नवनवीन फोन बाजारात येण्याची नेहमी वाट पाहत असतात.अशातच आता OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोनची सेल आज 30 जानेवारीपासून भारतात सुरू झाली आहे. हा फोन गेल्या आठवड्यात म्हणजे नुकतेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. त्यानंतर, या स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन Amazon India आणि OnePlus च्या अधिकृत साईटवर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात 100W SuperVOOC आणि 50W AirVOOC वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

onePlus 12 हे 50W Airvooc चार्जिंग असलेले उपकरण आहे.. फोन चार्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची स्ट्रिंग जोडण्याची गरज नसेल. कंपनी OnePlus 12 ला 4th Gen Hassleband कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 16GB LPDDR5X रॅम सह आणला आहे. OnePlus मोबाईलचा वापर करताना युझर्सला कोणताच त्रास होणार नाही. डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी डिस्प्ले ब्राइटनेस 70 निट्सपेक्षा कमी असून स्क्रीन 2160Hz PWM डिमिंग करता येते.

या मोबाईलच्या कॅमेरासुद्धा बेस्ट असणार आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने 1/1.4-इंच मुख्य सेन्सरसह 50MP Sony चा LYT-808 वाइड-एंगल कॅमेरा, 3X ऑप्टिकल झूमसह 64MP OV64B 3X पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 6X इन-सेन्सर झूम आणि Zoombrid12 सह 4th Gen Hasselblad कॅमेरा दिलाय. इतकेच नाही तर मोबाईल अवघ्या २३ मिनिटात चार्ज होईल. कंपनीने फोनमध्ये 100W वायर्ड SuperVOOC चार्जिंग सपोर्ट असेल तसेच 5,400mAh बॅटरी 50W AIRVOOC वायरलेस चार्जिंगने चार्ज करता येईल.

फोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. तर, 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. पहिल्या सेल ऑफर अंतर्गत, ICICI क्रेडिट कार्ड आणि वनकार्ड व्यवहारांवर 2000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर OnePlus 12 स्मार्टफोन 62,999 आणि 67,999 रुपयांना खरेदी करता येईल. एवढेच नाही तर, एक्सचेंज ऑफरअंतर्गत, फोनवर 10,000 रुपयांपर्यंत सूट देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये Flowy Emerald आणि Silky Black कलर ऑप्शन्स मिळतील. दरम्यान Amazon वरही तुम्ही हा फोन घेऊ शकतात.  OnePlus 12R फेब्रुवारीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल असे सांगितले जातं आहे.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांच्या वस्तू आता अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर मिळणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीला उद्योग म्हणून पाहणे गरजेचे – Dhananjay Munde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss