World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

सायकलला आपल्या जीवनात प्रचंड महत्वाचे स्थान आहे. लहांनापासून ते अगदी मोठ्यांपर्यत सर्वांनाच सायकल चालवायला खूप आवडते. बालपणात आपली पण सायकल असावी असे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

सायकलला आपल्या जीवनात प्रचंड महत्वाचे स्थान आहे. लहांनापासून ते अगदी मोठ्यांपर्यत सर्वांनाच सायकल चालवायला खूप आवडते. बालपणात आपली पण सायकल असावी असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सायकलचे अनेक फायदे देखील आहे. सायकलमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तसेच निसर्ग प्रदूषण मुक्त राहण्यास सुद्धा मदत होते. लहान मुले सायकल खेळण्यासाठी वापरतात तर मोठी माणसे सायकलचा वापर वाहन म्हणून करतात. अनेक लोक सायकलचा वापर शाळा, महाविद्यालय, कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी करतात. सायकलिंगमुळे वजन कमी होणे, स्नायूंची ताकद, चांगला व्यायाम इ. अशा अनेक फायदे आपल्याला होतात व आपण निरोगी राहतो. म्हणूनच लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो.

दरवर्षी ३ जून रोजी जगभरात जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. जागतिक सायकल दिन साजरा करण्यामागे अनेक उद्देश आणि फायदे आहेत. सायकल आपल्या पर्यावरणासाठी खूप फायदेशीर आहे, तर सायकल चालवणे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का सायकल दिन कधी पासून आणि का सुरु झाला? चला तर मग जागतिक सायकल दिनाचा इतिहास जाणून घेऊया.

सायकल दिन साजरा करण्याची सुरुवात २०१८ रोजी झाली. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक सायकल दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला व
३ जूनची तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हा पासूनच भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. सायकल दिनाची सुरुवात व्हावी म्हणून लेस्झेक सिबिल्स्की (Leszek Sibylski) यांनी मोहीम सुरू केली होती, ज्याला तुर्कमेनिस्तान (Turkmenistan) आणि इतर ५६ देशांनी पाठिंबा दिला. दरवर्षी जागतिक सायकल दिनाची थीम निश्चित केली जाते, ज्याच्या आधारे जगातील सर्व देश जागतिक सायकल दिन साजरा करतात. जागतिक सायकल दिनाची या वर्षाची म्हणजेच २०२३ ची थीम “शाश्वत भविष्यासाठी एकत्र स्वार होणे” अशी आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version