Sunday, May 19, 2024

Latest Posts

२०१९ मध्ये सलमानचा मारहाणी प्रकरणाचा गुन्हा दंडाधिकारी कोर्टाने बजावलेले समन्स हायकोर्टाने केले रद्द

बॉलीवूडमधील (Bollywood) सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) यांना २०१९ साली एका कथित पत्रकाराला मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता हे प्रकरण हायकोर्टाने रद्द केले आहे.

बॉलीवूडमधील (Bollywood) सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला २०१९ साली एका कथित पत्रकाराला मारहाणी संदर्भामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता हे प्रकरण हायकोर्टाने रद्द केले आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टाने बजावलेले समन्स हायकोर्टाने रद्द केले आहेत त्यामुळे सलमान खानला या प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे. या प्रकारांमध्ये सलमान खान सायकल चालवत असताना एका व्यक्तीने त्याचे चित्रण करत असताना ही बाब त्यांच्या सुरक्षा रक्षकांना आणि सलमानला आवडली नाही आणि त्यामुळे सलमानने कानशिलामध्ये लगावल्याचे आरोप संबंधित व्यक्तीने केले होते.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर या प्रकारांची सुनावणी झाली होती आणि सलमान खानचे हे मारहाणीचे प्रकरण रद्द केले आहे त्यामुळे सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे. साल २०१९ साली हे प्रकरण झाले होते. सलमान खान अंधेरीमध्ये सायकल चालवताना एका कथित पत्रकाराने त्याचे शूट केले होते आणि ते शूट यूट्यूब वर प्रसारित करण्यासाठी होते असे त्या कथित पत्रकाराने सांगितले होते. मात्र जेव्हा सलमानच्या अंगरक्षकाने त्याला हटकले तेव्हा त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्याला शिवीगाळ,धक्काबुकी केली आणि मोबाईल हिसकाहुन घेतला अशी तक्रार अशोक पांडे या पत्रकाराने अंधेरीच्या डीएननगर पोलीस स्थानकामध्ये केली होती.

हे प्रकरण जेव्हा अंधेरी कोर्टामध्ये पोहोचले तेव्हा समन्स जारी करत सलमान खानला कोर्टामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश जारी केले होते. त्यांनतर सलमान आणि त्याचा अंगरक्षक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकेमध्ये स्वतंत्रपणे सुनावणी झाली आणि या दोन्ही याचिकेमध्ये संपूर्ण प्रकरण रद्द करत सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता अंधेरी कोर्टातील प्रक्रिया आणि सलमान दिलेले समन्स हा हायकोर्टाच्या निकालानंतर रद्द करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss