Friday, April 19, 2024

Latest Posts

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे घ्या जाणून…

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होत आहे.

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प २०२४ सादर होण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ – २५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर होत आहे. आज सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट घेतली. येथे राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांचे तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर औपचारिक चर्चा झाली. केंद्रीय मंत्रीमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. तर आता हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत आहेत. तर अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल असं कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे.

निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • २०४७ पर्यंत भारत विकसित देश असेल
 • सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र
 • गेली १० वर्ष परिवर्तनाचा काळ
 • आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवलीय
 • सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न याच मंत्रानं आम्ही पुढे जातोय
 • पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अनेक लोकांना लाभ मिळाला
 • १० वर्षांत देशाचा सकारात्मक विकास
 • जास्तीत-जास्त रोजगार निर्माण करणार
 • अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल
 • गकरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी सरकारचं काम
 • युवांना बळ देणं हे मोदी सरकारचं काम
 • २५ कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून सरकारनं बाहेर काढलं
 • आमचं सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेनं काम करतंय
 • ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ
 • देशाला नवी दिशा आणि नवी उमेद मोदी सरकारनं दिलीय
 • युवांना सशक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू
 • नवीन मेडिकल कॉलेज सुरु करणार
 • आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे
 • तरुणांच्या सक्षमीकरणावरही आम्ही काम केलं आहे
 • आशा सेविकांना आयुष्मान योजना लागू होणार
 • जीएसटी प्रणालीमुळे ‘एक देश, एक बाजार‘ संकल्पना यशस्वी
 • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आणखी ३ कोटी घरे बांधली जाणार
 • स्किल इंडिया मिशन अंतर्गत १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण
 • संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला
 • पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची वर्षे असतील
 • १ कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत
 • तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे
 • सौर ऊर्जा योजनेद्वारे १ कोटी घरांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज देणार
 • ९ ते १४ वर्षांच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लस दिली जाणार
 • ४० हजार रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील
 • विमानतळांच्या संख्येत दुपटीने वाढ होणार
 • लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना
 • १ कोटी घरांना सौरउर्जा देण्याचं ध्येय

Latest Posts

Don't Miss