Saturday, May 18, 2024

Latest Posts

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्पात काय नवीन घोषणा करणार ?

अर्थमंत्री १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करण्यास नकार देण्यात आला.

यावर्षात आता मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं लोकांमधून नाराजी व्यक्त केली जातेय. आगामी अंतरिम अर्थसंकल्पात सरकार कोणतीही मोठी घोषणा करणार नसल्याचे वक्तव्य अर्थमंत्र्यांनी केलं आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या घोषणा होणार आहेत. जुलै २०२४ मध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची वाट पाहावी लागेल, असे त्या म्हणाल्या आहेत.

अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा नाहीत
, अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की CII ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरम २०२३ ला संबोधित करताना म्हणाल्या कि , मला तुमच्या आशा मोडायच्या नाहीत, परंतू, १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा केवळ मतदानासाठी आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. त्यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर वाट पाहावी लागणार आहे.

अंतरिम अर्थसंकल्पात २०१९ च्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत
अर्थमंत्री १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करण्यास नकार देण्यात आला. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. ज्यामध्ये शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक ६०००रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय करदात्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. कर सवलतीसाठी मानक वजावट मर्यादा ४००००

लोकसभेच्या निवडणुकीत लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता
२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. अशा स्थितीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रतिनिधी घोषणा केल्या जाऊ शकतात, असेही मानले जात आहे. या अर्थसंकल्पात काय होईल हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स म्हणजेच दिनेश फडणीस यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pankaja Munde – Devendra Fadnavis एकत्र येणार एकाच व्यासपीठावर ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss