spot_img
Monday, February 12, 2024
spot_img

Latest Posts

Baap Manus चित्रपटाच्या टीम सोबत खास गप्पा

'मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो..' या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या बापमाणूस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Baap Manus चित्रपटाच्या टीम सोबत खास गप्पा | बाप माणूस | Official Trailer | Pushkar Jog | Keya Ingle | 1st September 2023

‘मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो..’ या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या बापमाणूस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘फादर्स डे’ रोजी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं,ज्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूजबम्प्स् एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन यांचा ‘बापमाणूस’ हा चित्रपट येत्या १ सप्टेंबर रोजी आपल्या भेटीस येत आहे. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे.

Latest Posts

Don't Miss