Thursday, February 29, 2024

Latest Posts

फायनलआधी सगळंच महागलं!, हॉटेलचं भाडं १ लाख तर फ्लाइटचे दर….

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर २०२३ रोजी क्रिकेट विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हा सामना होणार असून फायनलची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी अहमदाबादला जाणारी विमानं आणि तिथल्या हॉटेल्सच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारतीय संघानं उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत भारताला विश्वचषक जिंकताना पाहण्यासाठी चाहते मोठी किंमत मोजण्यास तयार आहेत.

 

फायनलआधी सगळंच महागलं!, हॉटेलचं भाडं १ लाख तर फ्लाइटचे दर….

PUNE: नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

 

Latest Posts

Don't Miss