‘सुरक्षित आणि अपघात विरहित बस सेवा’, असे ध्येय एसटी महामंडळाचे आहे. ध्येय गाठण्यासाठी एसटी महामंडाळाने एसटी चालकांवर मोबाइल बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी चालवताना अर्थात बसच्या स्टेअरिंगवर बसण्यापूर्वी चालकाने आपला मोबाइल वाहकाकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एसटीच्या स्वमालकीच्या गाड्यांसह भाडेतत्वावरील वाहनांसाठीही हा नियम लागू राहणार आहेत. निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे. दोषी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
हे ही वाचा:
Maharashtra: Private Travel Bus चा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू