पिंपरी चिंचवडचे ‘जिजाऊ नगर’ हे नाव करण्याची मागणी | Demand to name Pimpri Chinchwad as ‘Jijau Nagar

राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यावरून मोठा राजकीय वाद वाद होत असताना आता पिंपरी चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी भक्ती-शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे

पिंपरी चिंचवडचे ‘जिजाऊ नगर’ हे नाव करण्याची मागणी | Demand to name Pimpri Chinchwad as ‘Jijau Nagar

पिंपरी चिंचवड हे नवसगळ्यांना प्रख्यात आहे. आणि पूर्वी पासून पुणे म्हंटलं की त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणून पिंपरी चिंचवड ची ओळख आहे. आणि आता राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यावरून मोठा राजकीय वाद वाद होत असताना आता पिंपरी चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी भक्ती-शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागात फ्लेक्स लावत भक्ती शक्ती प्रतिष्ठाणने ही मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड मधील संस्थेनेच ही नामांतराची मागणी केली आहे. औरंगाबाद आणि नगरचं नामांतर सरकार करू शकतं तर मग पिंपरी चिंचवडचं का नाही? असा सवाल या संघटनेने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ही मागणी करण्यात आली आहे. शहरात जवळपास १००हून अधिक ठिकाणी पिंपरी चिंचवडचे ‘जिजाऊ नगर’ हे नाव करण्याची मागणी करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समुळे शहरात चर्चेला उधाण आल आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नामांतराचा निर्णय सरकार घेणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. ऐन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका नामांतराच्या मागणीची भर पडल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सरकार नेमकं राजकारणात लक्ष घालणार की नामातंर करण्यामागे सरकारचे लाख असणार आहे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पिंपरी चिंचवडचे ‘जिजाऊ नगर’ हे नाव करण्याची मागणी | Demand to name Pimpri Chinchwad as 'Jijau Nagar'

हे ही वाचा:

Maharashtra Board SSC Result 2023, अखेर आज जाहीर होणार दहावीचा निकाल, कधी, कुठे व किती वाजता पाहाल रिझल्ट?

आज तिथीप्रमाणे Shivrajyabhishek Din, सोहळ्यासाठी सजला किल्ले रायगड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version