Sunday, May 19, 2024

Latest Posts

शिरूर येथील मतदारसंघाचा तिठा काही सुटेना ?

सध्याच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच सध्याच्या राजकारणामध्ये पक्ष पक्षामध्ये दावेदार उमेदवारी कोण यासाठी चुरस चालू आहे तसेच शिरूर येथे होणाऱ्या निवडणुकांमध्ये सद्य उमेदवारी नक्की कोणाला दिली जाणार यासाठी वाद सुरु आहेत.

सध्याच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच सध्याच्या राजकारणामध्ये पक्ष पक्षामध्ये दावेदार उमेदवारी कोण यासाठी चुरस चालू आहे तसेच शिरूर येथे होणाऱ्या निवडणुकांमध्ये सद्य उमेदवारी नक्की कोणाला दिली जाणार यासाठी वाद सुरु आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादीत घमासान सुरू आहे. ही जागा अमोल कोल्हेंनाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले असताना राष्ट्रावादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पुन्हा या जागेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यामुळे शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीय.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे खासदार कायमच ठरलेले खासदार आहे. ते प्रत्येकवेळेस शिरूर येथून निवडून देखील आलेले आहेत. त्यामुळे येणार लोकसभा २०२४ च्या निवडणुकीतही त्याच शिरूर येथून जागा मिळणार हे नक्की झालेलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी मुसंडी मारत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच अमोल कोल्हेंच्या भाजपासोबत गाठीभेटी वाढल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. परंतु, आपण भाजपासोबत जाणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी जाहीर केल्यानंतर शिरूरमधील तिढा जवळपास संपला होता. त्यामुळे विलास लांडे यांनी इच्छा जरी व्यक्त केली असली तरी देखील अमोल कोल्हे याना दावेदार ठरवणं का ? असं प्रश्न उभा ठाक आणि आणि अजून देखील या दोघांमधला नक्कीच आणि पक्का दावेदार कोण हा तिथं काही सोडवला गेला नहिये.

त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनुसार शिरूरच्या जागेवरून अमोल कोल्हे यांनाच तिकिट देण्यात येणार आहे. याबाबत खुद्द शरद पवार यांनीच मध्यस्थी केले असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, तरीही माजी आमदार विलास लांडे या जागेवरून इच्छूक आहेत. यावरून विलास लांडे म्हणाले की, “शरद पवारांचे विचार राज्यात आणि देशात नेणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अनेक कामं पूर्ण होण्याकरता पवारांनी काम करण्याची संधी दिली तर काम करायला आवडेल. विरोध होऊन काम करणार नाही. अमोल कोल्हे एक चांगला अभिनेता आहे. तो अभिनेता संभाजी महाराजांची भूमिका पार पाडणारा आहे. त्यामुळे एक आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. परंतु, पवार साहेबांनी दुसरीकडे कुठेही संधी दिली तरीही काम करायला तयार आहे. संधी नाही दिली तरी काम करणार आहे”, असं विलास लांडे म्हणाले.

हे ही वाचा:

नियमित मुंबई – पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यासाठी खुशखबर

Shinde – Fadnavis सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात भाजपच्या ६ तर शिवसेनेच्या ४ जणांना स्थान ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss