Saturday, March 2, 2024

Latest Posts

‘बिग बॉस१७’च्या घरात अंकिता करतेय सुशांतबाबतीतला एक खुलासा ,दुसऱ्यासोबत रोमान्स करताना पाहून मला अश्रू अनावर

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस १७’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम सतत कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतोच.

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस १७’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम सतत कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतोच.घरात होणारे राडे,ड्रामा आणि भांडण यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरजंन होत असते.दरम्यान बिग बॉस म्हंटलं तर भांडणं,राडा तर असणारचं.बिग बॉस १७ च्या या घरात वारंवार चर्चेत येणारी व्यक्ती म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन..

‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल आठवणीना उजाळा देत असते. हा कार्यक्रम सुरू होऊन 10 आठवडे पूर्ण झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत ‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. अंकिता आणि विकी दोघेही ‘बिग बॉस 17’मधील स्ट्रॉन्ग स्पर्धक आहेत. ही दोघं घरात सतत भांडत असतात,आणि यांच्या भांडणांचा फायदे इतर स्पर्धक घेत असतात.मात्र यांच्या भांडणांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कार्यक्रमात ती पती विकी जैनसोबत सहभागी झाली असली तरी एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल सतत भाष्य करताना ती दिसून येते.

अंकिता लोखंडेला पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे. सिनेमांत सुशांतला इतर कोणासोबत रोमान्स करताना पाहिल्यानंतर अंकिताला राग येत होता आणि त्यामुळे तिला रडू कोसळायचं. ‘बिग बॉस 17’च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अभिषेक सिंह, आयशा खान, अनुराग डोभाल आणि अंकिता लोखंडे गप्पा मारताना दिसत आहेत. त्यावेळी अभिषेक ईशाला इतर कोणासोबत रोमान्स करताना पाहयलं तर राग यायचा असं सांगतो.तर अभिषेकच्या बोलण्यानंतर अंकिता म्हणते,”माझ्यासोबतदेखील असं घडलं आहे. ‘शुद्ध देशी रोमान्स’ रिलीज झाला तेव्हा सुशांतने माझ्यासाठी अख्खं थिएटर बूक केलं होतं. सुशांतचे रोमँटिक सीन पाहिल्यानंतर मला राग येईल हे त्याला माहिती होतं. त्यावेळी त्याला इतर कोणासोबत रोमान्स करताना पाहून मला अश्रू अनावर झाले होते”.

अंकिता पुढे म्हणते,”सुशांतला इतर कोणासोबत रोमान्स करताना मला पाहावत नव्हतं. सिनेमानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला पाहून सुशांतही रडू लागला. सुशांत म्हणाला,”मला माफ कर गूगू… पुन्हा असं नाही करणार”. विकीदेखील माझे रोमँटिक सीन कधीच पाहू शकत नाही”दरम्यान बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे सतत दिवंगत सुशात सिंह राजपुतचा जप करताना दिसून येत असते.

हे ही वाचा:

POLITICS: नव्या व्हेरिएंटची तीव्रता बघून नियोजन करण्याची आवश्यकता- विजय वडेट्टीवार

winter season ;  जाणुन घ्या बाजरीपासून बनवले जाणारे ‘हे’ पदार्थ,हिवाळ्यात शरीरासाठी फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss