Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: नव्या व्हेरिएंटची तीव्रता बघून नियोजन करण्याची आवश्यकता- विजय वडेट्टीवार

जर तरच्या गोष्टीपेक्षा आम्ही प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी तयार आहोत. त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे. त्यांना महाविकास आघाडीची आवश्यकता असेल तर समन्वयाने पुढे जाता येईल.

मागील वेळी कोरोना जगामध्ये पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीने परिस्थिती महाविकास आघाडीने हाताळली होती, त्याची प्रशंसा सगळ्यांनीच केली होती. आता आलेल्या नव्या व्हेरिएंटची (NEW VARIENT) तीव्रता बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. मागील वेळी जी सामान्य माणसांची परिस्थिती झाली, ती पुन्हा होऊ नये. म्हणून योग्य वेळी सरकारने सावधपणे पाऊल टाकले पाहिजे. त्यावेळी औषधांचा तुटवडा पडल्यानं काही लोकांना जीव गमवावा लागला. ती परिस्थिती पुन्हा निर्माण होता कामा नये, असे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (VIJAY WADETTIWAR) यांनी व्यक्त केले.

विदर्भाच्या भूमीत काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा होत आहे. विदर्भाने नेहमीच काँग्रेसला भक्कम पाठिंबा दिला आहे. नोंद होईल अशा पद्धतीचा ही सभा होणार आहे. अशोक चव्हाण (ASHOK CHAVAN) या सभेच्या तयारीसाठी लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळी व्यवस्था सुरू आहे. सत्ता परिवर्तनाचा बिगुल आणि संदेश देशभर जाईल. वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसजनांची ताकद वाढवण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (VIJAY WADETTIWAR) यांनी माध्यमांना दिली.

यासोबतच, जर तरच्या गोष्टीपेक्षा आम्ही प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी तयार आहोत. त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे. त्यांना महाविकास आघाडीची आवश्यकता असेल तर समन्वयाने पुढे जाता येईल. कोण काय म्हणत? यापेक्षा २९ तारखेच्या बैठकीत दिल्लीत या सगळ्या विषयांवर चर्चा होईल. असेही यावेळी माध्यमांशी बोलतांना विजय वडेट्टीवार (VIJAY WADETTIWAR) यांनी सांगितले. तसेच, कोण काय म्हणतात? कोणाच वैयक्तिक मत आहे? इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल.इंडिया आघाडीतच हा निर्णय होईल. कोणी वैयक्तिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत जे काही एकमत असेल ते इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल. असे मत शरद पवार यांच्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

हे ही वाचा:

LIFESTYLE: MAKEUP करायच्या ‘या’ टिप्स तुम्हाला माहिती आहेत का?

Maharashtra Weather, नवीन वर्षात संकट येणार!, पावसाच्या आगमनाने होणार सुरुवात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss