मनोरंजन क्षेत्रात पुन्हा घडली दुर्दवी घटना…

सध्या मनोरंजन क्षेत्रातून अनेक घटना समोर येत आहे. काही लोक हि तणावाखाली आत्महत्या करताना बघायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येत आहे.

मनोरंजन क्षेत्रात पुन्हा घडली दुर्दवी घटना…

सध्या मनोरंजन क्षेत्रातून अनेक घटना समोर येत आहे. काही लोक हि तणावाखाली आत्महत्या करताना बघायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येत आहे. एका टीव्ही अभिनेत्याचे निधन (Actor passed away) झाले आहे. अत्यंत कमी वयामध्ये या अभिनेत्याने एक खास ओळख मिळवली होती. विशेष म्हणजे या अभिनेत्याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आदित्य सिंह राजपूत हा 32 वर्षाचा होता. आदित्य सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही वयाच्या १७ व्या वर्षीच केली होती. अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाच्या जोराने त्याने छाप सोडली होती.

या अभिनेत्याचे नाव आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) असे असून CID मालिकेत देखील काही वर्ष महत्वाच्या भूमिकेत आदित्य सिंह राजपूत दिसला होता. अनेक जाहिरातीमध्येही आदित्य सिंह राजपूत याने काम केले आहे. सोशल मीडियावर (Social media) तगडी फॅन फाॅलोइंग ही आदित्य सिंह राजपूत याची बघायला मिळते.आदित्य सिंह राजपूत याच्या निधनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरूम सापडला. आदित्य सिंह राजपूत याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात नेले असताना डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले आहे. आदित्य सिंह राजपूत याच्या निधनानंतर सर्वचजण दुखात दिसत आहेत.

आदित्य सिंह राजपूत याचे निधन नेमके कशाने झाले यावर जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत. आदित्य सिंह राजपूत हा टीव्ही क्षेत्रातील एक प्रसिध्द चेहरा होता. मुंबईतील अंधेरी येथे तो राहत होता. अंधेरी येथील एका सोसायटीमध्ये ११ व्या मजल्यावर आदित्य सिंह राजपूत याचा फ्लॅट आहे. याच प्लॅटमधील बाथरूममध्ये आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सापडला आहे. इमारतीचे वॉचमॅन आणि त्याच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात नेले.हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार आदित्य सिंह राजपूत याचे निधन हे ड्रग्समुळे झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या जवळच्या मित्राने याबाबत माहिती दिल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. आदित्य सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही मॉडल म्हणून केली होती. आता आदित्य सिंह राजपूत याच्या निधनाने सर्वच जण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

हे ही वाचा:

WATCH VIDEO : गंगा नदीत ४० लोकांची बोट उलटली; ४ जणांना जलसमाधी,काही जण बेपत्ता

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version