Tuesday, April 23, 2024

Latest Posts

Athiya Shetty आणि KL Rahul यांना चिमुकल्याची चाहूल?

अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) चार वर्षांच्या डेटिंगनंतर केएल राहुल ने २३ जानेवारी २०२३ मध्ये अथिया शेट्टी सोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले असून लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांना खाजगी आयुष्य जगायला आवडतं. याबाबत अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टीने एक मोठी बातमी दिली आहे.

सुनील शेट्टी सध्या माधुरी दीक्षितसोबत ‘डान्स दिवाने’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये जज आहेत. भारती सिंहने होस्ट केलेल्या शोमध्ये आजोबांचा एक भाग झाला. त्याच एपिसोड दरम्यान भारतीने सुनील शेट्टी यांना विचारले की, तुम्ही  आजोबा झाल्यावर कसे वागणार? कारण कोणतेही लहान मुलं इतक्या सुंदर आजी-आजोबांना सांभाळू शकत नाही, असे भारती त्यावेळी म्हणते. त्यावर सुनील शेट्टी म्हणतात की, होय.. पुढच्या सीझनमध्ये येईन तेव्हा आजोबासारखं स्टेजवर फिरेन. या सुनील शेट्टीच्या या  विधानाने  सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे आता आथिया शेट्टी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा चालू झाल्या आहेत. येत्या काळात लवकरच दोघे याबद्दल माहिती देतील. जरी अथिया शेट्टी प्रेग्नंट असली तरी तिलाही बातमी अजूनही प्रायव्हेटच ठेवायला आवडत असावी.  याशिवाय मागील काळापासून तिने कोणत्या चित्रपटात किंवा जाहिरातीमध्ये काम केलेलं नाही. अथिया शेट्टी (Athiya Shetty) क्वचितच कोणत्या कार्यक्रमामध्ये दिसते.

हे ही वाचा:

अंध मतदारांच्या सोयीसाठी असणार Braille Voter Information Slip

विकसित भारताच्या निर्मितीमध्ये रत्न आभूषण निर्यात क्षेत्राची भूमिका मोठी- Mukesh Ambani

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss