Brothers Day निम्मित पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून Raj Thackeray भावुक, छान दिवस होते…

मुलाखतीचा छोटासा प्रोमो हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. अर्थात या व्हिडिओ मध्ये मुलाखतीवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही काही जुने फोटो दाखवण्यात आले आहेत. या फोटोंत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे दिसत आहेत.

Brothers Day निम्मित पोस्ट चर्चेत; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून Raj Thackeray भावुक, छान दिवस होते…

आज एकीकडे संपूर्ण जगभरात दिवस ब्रदर्स डे (Brothers Day) साजरा केला जात आहे. हा दिवस प्रत्येक भावासाठी खास असतो. नावाप्रमाणेच, हा दिवस भावांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तर दुसरीकडे अवघ्या काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेली एक पोस्ट जोरदार चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ही दिसून येत आहेत.

लवकरच छोट्या पडद्यावरील झी मराठी या वाहिनीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची जोरदार चर्चा देखील सुरु आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ ही ती मालिका असून याची तुफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या कार्यक्रमाचे या अगोदरचे दोन पर्व चांगलेच गाजले होते. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रमच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या आधी य कार्यक्रमात पहिली हजेरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार कि दमदार व्यक्तिमत्व असलेले आज ठाकरे लावणार अश्या चर्चा या सुरु होत्या. परंतु आता या कार्यक्रमाची सुरूवातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीने होणार आहे. या मुलाखतीतील एक छोटासा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. ४ जून २०२३ रोजी रविवारी ९ वाजता ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हे ही वाचा : 

करिअरमध्ये आईची भक्कम साथ…, सईने सांगितलं आईसोबतचे नातं

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण डीके शिवकुमार की सिध्दरमैया? दिल्लीत फैसला | Karnataka Election 2023

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version