Monday, May 13, 2024

Latest Posts

Sadabhau Khot यांच्या Sharad Pawar यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्याचा Rohit Patil यांनी घेतला चांगलाच समाचार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत ‘म्हातारं लय खडूस’ या केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले, “सदाभाऊंच्या स्टेटमेंटला अनुसरून बोलायचं राहिलं तर ‘म्हातारा किती खमका’ आहे हे सदाभाऊंना अद्याप माहित नाही. देशाला आणि राज्याला जेव्हा गरज असते तेव्हा देशाचे नेतृत्त्वाने सुद्धा शरद पवारांचा सल्ला घेतला आहे. याचा अंदाज शिराळात बसून सदाभाऊंना आला नसावा म्हणून तसे ते बोलले आहेत.”

रोहित पाटील म्हणाले, “आम्ही शरद पवारांना साहेब म्हणूनच उच्चार केला आहे .मात्र सदाभाऊंच्या स्टेटमेंट ला अनुसरून बोलायचं राहिला तर म्हातारा किती खमक आहे हे सदाभाऊंना अद्याप माहित नाही. या वयामध्ये सुद्धा शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) उमेदवारासाठी ५५ सभा घेतल्या आहेत पुढेही वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. देशाला आणि राज्याला जेव्हा गरज असते तेव्हा देशाचे नेतृत्व सुद्धा शरद पवारांचा सल्ला घेतला आहे. याचा अंदाज शिराळात बसून सदाभाऊंना आला नसावा म्हणून तसे ते बोलले आहेत. त्यांच्यावर विश्वासहर्ता किती राहिले आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. शरद पवारांवर जो कोणी आघात करण्याचा प्रयत्न करतील त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक शांत बसणार नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची काल (शनिवार, २७ एप्रिल) कोल्हापुरात सभा झाली. या सभेबाबत बोलताना रोहित पाटील म्हणाले, “कोल्हापुरात नरेंद्र मोदींच झालेलं भाषण हे इतर भाषणांपेक्षा निराशाजनक होतं. पक्षाचं चिन्ह नसेल म्हणून त्यांनी असं भाषण केलं असावं. त्यांनी जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांच्या हातातून निसटला आहे. लोक मूलभूत प्रश्नांवर बोलत आहेत त्याची जाण त्यांना झाली आहे. कोल्हापूरची माणसं स्वाभिमानी आहेत त्यांच्या ताठ स्वाभिमानी बाणा पहिल्यापासून आहे. मतदानात पोटात एक आणि ओठात एक असे कोल्हापूरकर करणार नाहीत, त्यामुळे मान आणि महत्त्व सुद्धा गादीला मिळेल,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांची मोठी घोषणा, सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी न झाल्यास…

PM Narendra Modi यांची भाषा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss