Saturday, May 18, 2024

Latest Posts

बॉलिवूड कलाकारांनी आपल्या कुटुंबासह केला नाताळ साजरा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांची सगळ्याच बाजूने कोंडी झाली होती. घरात बसून लोकांना कोणतीच गोष्ट मनाजोगी करता येत नव्हती. पण आता निर्बध शिथिल झालेत आणि सणांवरच विरजण हटलंय त्यामुळे प्रत्येक सण हा त्याच उत्साहात साजरा होत असताना आपल्याला दिसते. तसेच आज २५ डिसेंबर रोजी (Christmas Day ) जगभरात नाताळ साजरा होत आहे. प्रत्येक जण आपल्या परिवाराला सोबत घेऊन नाताळ सेलिब्रेट करतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर ह्यात सोने पे सुहागा म्हणजे कलाकार कालपासूनच नाताळची तयारी करतानाच्या पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. कोरोनानंतर साजरा होणार हा नाताल सण लोकांमध्ये नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. हिंदी मालिकेची कलाकार दिव्यांका त्रिपाठी ने सोशअ मीडिया वर एक व्हिडीओ शेअर केलं आहे. व्हिडीओ मध्ये एक सुंदर सजवलेला ख्रिस्तमस ट्री दिसतेय, त्याचबरोबर घरात उत्साहाचं वातावरण आहे. व्हिडीओ मध्ये ती स्वतः सासू आणि नंदेसोबत सांताक्लाजच्या गाण्यावर आनंदात डोलताना आपल्याला दिसतेय . कॅपशनला तीने लिहिलंय आम्ही सातांचे  आवडते हरीण आहोत. अश्या प्रकारे तिने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा (merry christmas)दिल्या आहेत.

 हेही वाचा    Good Governance Day अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिन’ का साजरा केला जातो?

तसाच एकीकडे छोट्या पडद्यावरील अभिनेता अर्जुन बिजलानीने घरीच नाताळचा सण साजरा केला आहे. अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओत तो मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. घरात नाताल ची सजावट केलेली दिसतेय. व्हिडीओ मध्ये त्याचा मुलगा त्याला सांताची टोपी बाबाला घालताना दिसतोय. बाप लेकाचा गोड नातं दिसतंय शेवटी बाबा अर्जुन त्याच्या मुलाला गॉड ‘पापा देतोय प्रेम विडिओ मध्ये दिसून येतंय. व्हिडीओ शेयर करून त्याने आपल्या चाहत्यांना नाताळ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्टार कपल अली गोनी आणि जास्मिन भसीन सध्या गोव्यात असून ते कुटुंबियांसोबत नाताळचा सण साजरा करत आहेत. अलीने सोशल मीडियावर कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यात तो म्हणतो ‘गॅंग इन गोवा ‘ (goa) असे म्हणत आहे.

हेही वाचा:

 WhatsApp, Instagram ॲप्ससह साजरा करा Christmas, ट्रेंडी स्टिकर वापरून प्रियजनांना द्या Merry Christmasच्या शुभेच्छा

Latest Posts

Don't Miss