Sunday, May 5, 2024

Latest Posts

WhatsApp, Instagram ॲप्ससह साजरा करा Christmas, ट्रेंडी स्टिकर वापरून प्रियजनांना द्या Merry Christmasच्या शुभेच्छा

तुम्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांशी संपर्क साधण्यासाठी तंत्रज्ञानाची (Technology) मदत घेऊ शकता.

२५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमस सणाचा (Christmas 2022) दिवस. आजच्या दिवशी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण जगभर साजरा केला जातो. पण या खास प्रसंगी, जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर असाल आणि नातेवाईक, जवळच्या मित्रांसोबत ख्रिसमसची सुट्टी साजरी करू शकत नसाल, तर तुम्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांशी संपर्क साधण्यासाठी तंत्रज्ञानाची (Technology) मदत घेऊ शकता.

आजकाल व्हाट्सॲप (WhatsApp), इंस्टाग्राम ( Instagram) सारखी अनेक लोकप्रिय इंस्टंट मेसेंजिंग ॲप्स (Instant Messaging Apps) लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना या ख्रिसमसच्या (Christmas 2022) निमित्ताने अतिशय मनोरंजक स्टिकर्सद्वारे (Stickers) शुभेच्छा पाठवू शकता. साधा “मेरी ख्रिसमस”(Merry Christmas) टेक्स्ट मेसेज पाठवण्याऐवजी, तुम्ही व्हाट्सॲप (WhatsApp) आणि इंस्टाग्राम ( Instagram) सारख्या ॲप्सद्वारे ख्रिसमसच्या दिवशी मजेदार स्टिकर्स पाठवू शकता. मेसेजिंग ॲपद्वारे तुम्ही तुमच्या संपर्क यादीतील लोकांना अतिशय मनोरंजक स्टिकर्स कसे पाठवू शकता हे आज आपण आज जाणून घेणार आहोत.

व्हाट्सॲपद्वारे (WhatsApp) मजेदार “मेरी ख्रिसमस”(Merry Christmas) स्टिकर्स कसे पाठवायचे?

व्हाट्सॲपवर (WhatsApp) ख्रिसमस स्टिकर्स पाठवण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून स्टिकर पॅक (Sticker Pack) डाउनलोड करावे लागतील. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरच्या (Google Play Store) सर्च बारमध्ये ‘ख्रिसमस स्टिकर्स’ (Christmas Sticker) लिहून सर्च करावे लागेल. असे केल्याने, तुमच्या हँडसेटवर अनेक परिणाम दिसून येतील. यापैकी कोणतेही ॲप इंस्टॉल करा. त्यानंतर ॲप ओपन केल्यावर तुम्हाला ख्रिसमसशी (Christmas) संबंधित अनेक स्टिकर पॅक दिसतील. ॲड बटण म्हणजेच सर्व स्टिकर्सच्या पुढे + प्लस चिन्ह म्हणून दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला हवे ते स्टिकर पॅक(Sticker Pack) निवडा.

ॲपमध्ये ते स्टिकर्स जोडल्यानंतर, तुम्ही WhatsApp, माध्यमातून तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना ख्रिसमसच्या (Christmas 2022) शुभेच्छा देण्यासाठी स्टिकर्स (Stickers) पाठवू शकता किंवा तुम्ही मेरी ख्रिसमसच्या (Merry Christmas) शुभेच्छा पाठवू शकता. तुम्ही इमोजी विभाग उघडून आणि ॲपमध्ये जोडलेल्या सर्व नवीन ख्रिसमस स्टिकर्ससाठी (Christmas Sticker) अगदी उजव्या बाजूला असलेल्या टॅबवर जाऊन हे करू शकता.

इंस्टाग्रामद्वारे (Instagram) मजेदार “मेरी ख्रिसमस”(Merry Christmas) स्टिकर्स कसे पाठवायचे?

इंस्टाग्रामवर (Instagram) मित्रांना ख्रिसमस-थीम (Christmas Theme) असलेली स्टिकर्स पाठवणे सोपे आहे. यासाठी तुमच्या हँडसेटमध्ये वापरल्या जाणार्‍या ॲपवर जाऊन डायरेक्ट मेसेज (DM) विभाग उघडा, तुम्हाला ज्या मित्राला पाठवायचे आहे त्याची चॅट विंडो उघडा. तुम्ही हे केल्यावर, तुम्हाला ओपन प्रॉम्प्टच्या तळाशी मजकूर-टायपिंग बारच्या पुढे एक स्टिकर चिन्ह दिसेल. हा पर्याय व्हॉइस-रेकॉर्डिंग आणि प्रतिमा-संलग्नक बटणांपुढील सर्वात उजवीकडे बटण आहे. ‘स्टिकर-सर्च बार’ (Sticker Search Bar) उघडण्यासाठी संबंधित बटण वापरा. ख्रिसमस-थीम (Christmas Theme) असलेली स्टिकर्स पाठवण्यासाठी तुम्ही आता स्पेसमध्ये ‘ख्रिसमस’ ((Christmas) टाइप करून शोधू शकता. तुम्ही तुमचे आवडते ख्रिसमस-थीम असलेले स्टिकर्स टॅप करून तुमच्या मित्रांना पाठवू शकता.

आठवडाभरानंतर नवीन वर्षही दार ठोठावणार आहे. या प्रसंगी, या पद्धतींचा अवलंब करून, आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा खूप खास पद्धतीने पाठवू शकता.

हे ही वाचा:

Christmas च्या दिवशी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं हे वेळापत्रक तपासा

Christmas Party 2022 ख्रिसमस पार्टीसाठी करा असा सिम्पल मेकअप आणि दिसा सुंदर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss