दिव्या भारतीच्या मृत्यूचे खरे कारण, सहकलाकाराने केला खुलासा

अवघ्या १९ व्या वर्षी दिव्या ने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे गूढ आजवर कळलेलं नाही.

दिव्या भारतीच्या मृत्यूचे खरे कारण, सहकलाकाराने केला खुलासा

बॉलीवूड मधील दिव्यंगत अभिनेत्री दिव्या भारती हिने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले होते. आपल्या सौंदर्याने आणि कलाकारीने तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला होता. पण हे जास्त दिवस चाललं नाही वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्या ने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे गूढ आजवर कळलेलं नाही.दिव्या ने अगदी लहान वयात चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होते. ३ वर्षातच ती बॉलीवूड मधील फेमस अभिनेत्री बनली होती पण तिच्या अकाली मृत्यु ने एकच खळबळ उडाली होती. दिव्याने आपल्या अपार्टमेंटच्या पाचव्या माळ्यावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले असे सांगण्यात येते परंतु दिव्याची हत्या झाली असून तिचा खून करण्यात आला होता असेही काही जण सांगतात. म्हणून दिव्या च्या मृत्यू चे नेमके कारण अजून उघडकीस आले नाही.

दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी दिव्याचा सहकलाकार अभिनेता कमल सदाना याने पुढे येऊन मृत्यू बाबत वक्तव्य केले आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कमल सदाना याने म्हंटल आहे, “झालेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं अशक्य होत. दिव्या खूप चांगली अभिनेत्री होती. तिचा खेळकर स्वभाव होता. तिच्यासोबत काम करायला मला आवडायचे. निधनाची बातमी कळल्यानंतर माझा त्यावर विश्वास च बसला नाही ते कसे शक्य आहे असे मला वाटले.” कमल सदाना यांनी सांगितले कि दिव्याकडे भरपूर पिक्चर्सच्या ऑफर्स होत्या. एका मागे एक असे तिचे चित्रपट लाईन अप होते. या चित्रपटानंतर ती एक आघाडीची अभिनेत्री बनू शकणार होती. मला वाटत कि जे झालं तो अपघात असेल. त्यावेळी तिने भरपूर ड्रिंक केलं असावं ज्यामुळे तोल जाऊन ती खाली पडली आणि मृत पावली. तिच्याबरोबर काम करताना ती नेहमी खुश दिसायची.

याचबरोबर दिव्या भारतीच्या वडिलांनी जेव्हा तिच्या मृत्यूच्या अफवा पसरु लागल्या तेव्हा हा सर्व अपघात होता खून आणि आत्महत्येचा प्रश्न उद्भवत नाही असे निवेदन हि जारी केले होते. दिव्याला ‘शोला और शबनम ‘, ‘दिवाणा’ आणि विश्वात्मा या मूव्हिस मधून विशेष प्रसिद्धी मिळाली होती.

हे ही वाचा:

Salman Khan च्या घरावर गोळीबार, CM Eknath Shinde यांनी केली फोनवरून चर्चा
BJP चा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, Nana Patole यांचा घणाघात
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version