तुम्हाला माहित आहे का Ashok Saraf यांना ‘अशोक’ नाव कसे पडले ? जाणून घ्या मामांचा हा खास किस्सा

मराठी नाटक, मालिका तसेच सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांना सर्व जण मामा म्हणून ओळखतात.

तुम्हाला माहित आहे का Ashok Saraf यांना ‘अशोक’ नाव कसे पडले ? जाणून घ्या मामांचा हा खास किस्सा

मराठी नाटक, मालिका तसेच सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांना सर्व जण मामा म्हणून ओळखतात. मामांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात आपले मोठे स्थान निर्माण केले. विनोदाचा कमाल टाईमिंग असणाऱ्या मामांनी प्रत्येकालाच खळ-खळून हसवले. परंतु तुम्हाला माहित आहे का अभिनयाच्या या सम्राटाचे नाव अशोक का व कसे पडले? नसेल तर चला आज जाणून घेऊयात.

अशोक सराफ यांच्या निगडित अनेक रंजक किस्से हे चर्चेत असतात. तसाच एक रंजक किस्सा हा त्यांच्या ‘अशोक’ या नावा मागे आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर मामांचे नाव ‘अशोक’ ठेवण्यात आले, त्यांनाच कालांतराने मामांनी आपल्या आयुष्यातील गुरुचे स्थान दिले. काहीच वर्षांपूर्वी मामांच्या ‘अशोक’ या नावा मागचा एक रंजक किस्सा अशोक सराफांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्राम पोस्टमधून सोशल मीडियावर शेअर केला होता.

निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ आणि अशोक कुमार यांचा फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला होता. व या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्यांनी मामांच्या नावा मागचा रंजक किस्सा सांगितला आहे. निवेदिता यांनी कॅप्शन मध्ये, ‘गुरू शिष्य… मोठी बहीण विजया अशोककुमारांची खूप मोठी चाहती होती. त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं आणि ईश्वरानेही तथास्तु म्हटलं. अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ झाला.’ तसेच निवेदिता यांनी असे पण कॅप्शन मध्ये लिहिले होते की अशोक सराफ आजही अशोक कुमारांना गुरू स्थानी मानतात. ही पोस्ट निवेदिता यांनी २०२० मध्ये शेअर केली होती.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version