Wednesday, May 15, 2024

Latest Posts

Kalyan लोकसभा मतदारसंघात Raj Thackeray यांची सभा होणार? Shrikant Shinde यांचे मोठे वक्तव्य

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे (Kalyan Loksabha Constituency) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मोठे वक्तव्य करत ‘राज ठाकरे यांची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आनंद होईल,’ असे म्हंटले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होत आहेत. अश्यातच, श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याने त्यांच्या प्रचारार्थ मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा कल्याणमध्ये होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

डोंबिवली येथे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, “डोंबिवली मध्ये एक तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असून राज ठाकरेंच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. त्यामुळे, राज ठाकरेंची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आम्हाला आनंदच असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विविध घटक पक्षांचे मेळावे घेत आहेत महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeraay) यांना टोला लगावला. ते म्हणाले, “एकीकडे राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय. ते धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत असं बोलतायत किती मोठी शोकांतिका आहे. बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केलंय. त्यांच्या प्रमुखांनी केलं आज त्यांना जे अनेक वर्ष पाहिजे होतं ते त्यांनी त्या ठिकाणी केलय. त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचं होतं जी काँग्रेस सावरकरांना मानत नाही सावरकरांना रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे मांडी लावून बसतात.”

“जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा आहे. आम्हाला अभिमान आहे, हिंदुत्वाबरोबर उभे राहिलो आम्ही बाळासाहेबांचा विचार बरोबर उभे राहिलो आम्ही सावरकरांच्या विचारांबाबत उभा राहिलो म्हणून जो आहे धनुष्यबाण आणि शिवसेना जे आहे एकच सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. सगळे शिवसैनिक हे शिंदे साहेबांसोबत उभे आहेत आणि येणाऱ्या चार तारखेला आणि जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा खऱ्या शिवसेनेबरोबर कशाप्रकारे लोक मजबुतीने उभे हे तुम्हाला कळेल,” असे ते म्हणाले. 

हे ही वाचा:

Uddhav Thackeray Live: कोकण हे शिवसेनेचे हृदय, गद्दारांचे दोन मालक दिल्लीत…

जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – Imtiyaj Jaleel

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss