Tuesday, January 23, 2024

Latest Posts

ख्रिसमसच्या खास दिवशी आलिया-रणबीरने दाखवला राहाचा चेहरा,व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर  आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघं नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर  आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघं नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात.तर यावेळी ते चर्चेत आलेत पण एका खास गोष्टीमुळे ते म्हणजे त्यांची लाडकी लेक राहा हिचा चेहरा त्यांनी ख्रिसमसच्या या खास दिवशी दाखवला आहे.आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीला फोटोसाठी पोज दिल्या.

रणबीर – आलियाला राहा ही मुलगी आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. राहाच्या जन्मानंतर रणबीर – आलियाने तिला मीडियापासून लांब ठेवलं होतं. राहाचा पहिला वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आहे.आणि आता राहा एक वर्षाची झाली आणि त्यात आज ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर – आलियाने लेकीला सर्वांसमोर आणलंय. राहाला रणबीरने कडेवर घेतलं होतं. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

ख्रिसमस  लंच प्रोग्रॅमसाठी कपूर कुटुंबानं खास लूक केला होता. यावेळी राहा ही व्हाईट फ्रॉक, दोन पोनी टेल आणि रेड शूज अशा क्युट लूकमध्ये दिसली. राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आलिया ही अनेकवेळा राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण या फोटोंमध्ये राहाचा चेहरा रिव्हिल करण्यात आला नव्हता. आता रणबीर आणि आलिया यांनी राहाचा चेहरा रिव्हिल केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी राहाचा पहिला वाढदिवस रणबीर आणि आलियानं साजरा केला. राहाच्या पहिल्या बर्थ-डेच्या सेलिब्रेशनचे फोटो आलियानं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,  “आमचा आनंद, आमचं आयुष्य आणि आमच्या जीवनातील प्रकाश, तू माझ्या पोटात लाथा मारत आहेस, हे  परवा घडलं असं मला वाटत आहे. माझ्याकडे भावना मांडण्यासाठी शब्द नाहीत पण तू आमच्या आयुष्यात आहेस, हे आमचं भाग्य आहे. तू आम्हाला एका चविष्ट केकच्या तुकड्याप्रमाणे वाटत आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी टायगर, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो.”राहाची पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते देखील खूप खुश आहेत.

हे ही वाचा:

हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून सावध राहायचं असेल तर,संत्री ठरु शकतात फायदेशीर

वर्ध्यातील कारंजामधील फार्म हाऊसवर दरोडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss