Friday, March 1, 2024

Latest Posts

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

सध्या देशभरात ख्रिसमस अतिशय धूमधडाक्यात साजरा होत आहे,खरतर डिसेंबर महिना आला की ख्रिसमसच्या सणाची प्रत्येकालाच ओढ लागते,बरं हा सण देखील सगळेच साजरा करतात.

सध्या देशभरात ख्रिसमस अतिशय धूमधडाक्यात साजरा होत आहे,खरतर डिसेंबर महिना आला की ख्रिसमसच्या सणाची प्रत्येकालाच ओढ लागते,बरं हा सण देखील सगळेच साजरा करतात.ख्रिसमस या सणाची प्रत्येकाची एक वेगवेगळी आठवण असते.आणि साजरा करण्याची देखील वेगवेगळी पद्धत देखील असते.विशेषतः लहान मुलांमध्ये सांताक्लॉजबद्दल खूप उत्साह दिसून येतो. त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सांता येणार, याची ते वर्षभर वाट पाहतात.

याचदरम्यान ख्रिसमस या सणाचा जल्लोष आपल्याला बॉलीवूडकरांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळत असतो.त्यांची ती नाईट पार्टी,त्यांचा एकंदरीत घातलेला आउटफिट हे सगळचं लक्ष वेधून घेणारं असतंच,मात्र प्रत्येकाची ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत देखील वेगळी असते.सध्या अभिनेत्री सनी लिओनी तिच्या कृतीमुळे खुपचं चर्चेत आहे,ते म्हणजे यावेळी तिने गरजु मुलांसोबत तिचा ख्रिसमस साजरा केला आहे,तस बघायला गेलं तर सनी लिओनी एक अशी अभिनेत्री आहे,की ती तिचा वेळ या मुलांसाठी वेळोवेळी काढत असते,त्यासाठी ती हजरो गरजू मुलांच्या मनात घर करुन बसली आहे. सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल यांनी गरजू लोकांसोबत ख्रिसमस साजरा केला. या जोडप्याने गरजू मुलांना ख्रिसमस भेटवस्तू दिल्या. सनी लिओनी माणूस म्हणून किती चांगली आहे याचं उत्तम उदाहरण, असे चाहते म्हणत आहेत.सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असल्यामुळे तिच सर्वत्र कौतुक देखील होत आहे.दरम्यान सनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,ती तिचे व्हिडिओ,फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते,तिचा चाहता वर्ग मोठा असल्याने तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते चांगली पसंती दर्शवतात.

दरम्यान आता सनी लिओनी लवकरच ‘ग्लॅम फेम’मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’मध्ये राहुल भट्टसोबत अभिनय करताना दिसणार आहे. याशिवाय सनी ही जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारासोबतच  ‘कोटेशन गँग’ मध्ये झळकणार आहे.  सनीने ‘जिस्म २’ चित्रपटातून’ बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘बिग बॉसच्या ५ व्या’ सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.दरम्यान सनी लिओनी तिच्या कामातून आणि तिच्या प्रेमळ स्वभावातून तसच ती करत असलेल्या तिच्या समाजकार्यातून प्रेक्षकांचे कायम मन जिंकत असते.

हे ही वाचा:

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

शुभमंगल सावधान;स्वानंदी-आशिषची ‘आनंदी’ साथ,विवाहसोहळा पडला पार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss