Thursday, February 29, 2024

Latest Posts

शुभमंगल सावधान;स्वानंदी-आशिषची ‘आनंदी’ साथ,विवाहसोहळा पडला पार

शुभमंगल सावधान;स्वानंदी-आशिषची ‘आनंदी’ साथ,विवाहसोहळा पडला पार

सध्या सर्वत्र लगीनसराई सुरु आहे.मराठी कलाविश्वातील कलाकारांना सध्या लग्नाचे वेद लागले आहेत.नुकतच गौतमी आणि स्वांनदचा विवाहसोहळा पार पडतोच आहे.तोपर्यत दुसरीकडे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि इंडियन आयडॉल  फेम आशिष कुलकर्णी यांचा देखील विवाहसोहळा पार पडला आहे. यांनी 25 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. सध्या मराठी सिनेसृष्टीत सेलिब्रिटीच्या लग्नसोहळ्यांची रेलचेल सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुरुची आडारकर आणि पियुष रानडे,मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता सध्या या जोडप्यांवरही चाहते प्रेमाचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळतंय. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नसोहळ्यात कलाविश्वातील त्यांच्या मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावली होती. ग्रहमख, मेहंदी, हळद आणि संगीत या प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वानंदी आणि आशिषच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वानंदी – आशिषने नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या फोटोत स्वानंदीने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली असून आशिषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केलाय. आशिषने लग्नात स्वानंदीच्या साडीला मॅचिंग असं पैठणी उपरणं परिधान केलंय.

स्वानंदीने सोन्याचे दागिने घातले असून आशिषने मोत्यांची माळ घातलीय. दोघांच्या लग्नाच्या फोटोंना त्यांच्या फॅन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आयुष्यभराची ‘आनंदी साथ’ असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केलेतस्वानंदीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाआधी झालेल्या संगीत सेरेमनीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत स्वानंदीच्या संगीत सोहळ्यासाठी तिचे कुटुंबिय आणि इंडस्ट्रीतले मित्र – मैत्रीण दिसले. या सोहळ्यासाठी स्वानंदीच्या आई – बाबांनी खास डान्स करताना दिसला. याशिवाय सुव्रत जोशी, सखी जोशी, जुईली जोगळेकर, रोहित राऊत अशा अनेक कलाकारांनी धम्माल केलेली दिसली.

अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची स्वानंदी लाडकी लेक आहे.स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली. तर आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आहे. 2008 साली ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात आशिष सहभागी झाला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. आशिषने ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी देखील गायली आहेत.दरम्यान आता स्वानंदी आणि आशिषच्या आनंदी प्रवासाला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा:

ख्रिसमसच्या खास दिवशी आलिया-रणबीरने दाखवला राहाचा चेहरा,व्हिडिओ व्हायरल

 

हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून सावध राहायचं असेल तर,संत्री ठरु शकतात फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss