Saturday, March 2, 2024

Latest Posts

ख्रिसमसच्या सुट्टीने प्रभासच्या ‘सालार’ने उचलला फायदा,२५० कोटींपेक्षा अधिकची कमाई

प्रभासचा ‘सालार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग करत आहे. सालारला रिलिज होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. त्यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

बॉलीवूडमध्ये यंदा अनेक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला चांगलाच जम बसवला आहे.शाहरुखचा जवान,पठाण असो,रणबीरचा अँनिमल किंवा आता प्रभासचा सालार चित्रपट असो यावर्षी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कमाई केली आहे.सध्या आता प्रभासचा ‘सालार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार बॅटिंग करत आहे. सालारला रिलिज होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. त्यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.दरम्यान प्रभासच्या सालार चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर कोटींची घौडदौड सुरुचं ठेवली आहे.

प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाच्या अपयशानंतरचा सालार हा दुसरा चित्रपट आहे.आदिपुरुरष हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही म्हणुन प्रेक्षक प्रभासच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.हा चित्रपट प्रर्दशित होण्यापासूनचं चर्चेत होता.त्यामुळे प्रदर्शित झाला आणि सर्वत्र चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली,इतकच काय आदल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ चित्रपटाला मागे टाकतं ‘सालार’ चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर आपली यशस्वी घौडदौड चालूचं ठेवली आहे. ‘सालार’ हा सिनेमा फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 325 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.दरम्यान वीकेंड असल्यामुळे या चित्रपटाला यांचा अधिक फायदा झाला आहे.ख्रिसमसच्या सुट्टीला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘सालार’ हा सिनेमा पाहिला आहे.

दगम्यान 22 डिसेंबर 2023 रोजी ‘सालार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला ‘सालार’ने 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 62.5 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 42.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या चित्रपटाने 251.60 कोटींची कमाई केली आहे.तर या चित्रपटाने जगभरात 325 कोटींचं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर जमवलं आहे.

सालार सीझ फायर- भाग 1 मध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भुमिकेत आहे. या सोबतच चित्रपटात श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, सरन शक्ती यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आहेत. ‘सालार’ या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा केजीएफ फेम प्रशांत नील यांनी सांभाळली आहे.सालारच्या भरघोस यशानंतर आता प्रेक्षकांमध्ये सालारच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss