Tuesday, May 21, 2024

Latest Posts

शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

दरम्यान टीझरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय ती म्हणजे टीझरमध्ये अवघ्या काही सेकंदात एका मराठी ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चांगलाच भाव खाल्लेला दिसतोय.

बॉलीवूडचा बादशाहा शाहरुख खानच्या वाढदिवसाला त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘डंकी’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला .डंकी या सिनेमातील काही सीन आपल्याला खळखळुन हसायला लावणारे आहेत. शाहरुखचा रॉकींग अंदाज डंकीच्या टीझरमध्ये पाहायला मिळतो. टीझरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय ज्यामुळे मराठी लोकांना सुखद धक्का बसलाय.

शाहरुखचा डंकी सिनेमाचा टीझर सर्वांना आवडलेला आहे.प्रेक्षकांनी या सिनेमाच्या टीझरला भरभरुन प्रतिसाद देखील दिला आहे.दरम्यान टीझरमध्ये एक खास गोष्ट दिसतेय ती म्हणजे टीझरमध्ये अवघ्या काही सेकंदात एका मराठी ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चांगलाच भाव खाल्लेला दिसतोय. या अभिनेत्री म्हणजे ज्योती सुभाष.ज्योती सुभाष शाहरुखच्या डंकीमध्ये आजीची भुमिका साकारताना दिसत आहेत. टीझरमध्ये एक सीन येतो ज्यामधये शाहरुखच्या मित्राची आई त्याला आजीची शपथ घ्यायला सांगते. त्यावेळी ज्योती सुभाष म्हणतात, अरे सारखी माझीच शपथ का घेता? आणि पुढे त्यांचं निधन झालेलं दिसतं. हा धम्माल कॉमेडी प्रसंग पाहून हसायला येणारं हे नक्की.

ज्योती सुभाष या शाहरुखसोबत बहुचर्चित  डंकी या सिनेमात झळकल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची उस्तुकता लागली आहे. ज्योती सुभाष या गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात काम करत आहेत. नाटक, मालिका, सिनेमा, शॉर्ट फिल्मस अशा विविध माध्यमांमध्ये ज्योती सुभाष यांनी काम केलं आहे.ज्योती या गेल्या काही वर्षांपासुन हिंदी इंडस्ट्री सुद्धा गाजवत आहेत. त्यांनी रणवीर सिंग सोबत गली बॉय या सिनेमात अभिनय केला होता. आता शाहरुखच्या डंकी सिनेमात ज्योती सुभाष यांना पाहण्याची उत्सुकता आहे.डंकीचा टीझर आल्यापासुन शाहरुख खानच्या सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.

डंकी सिनेमात शाहरुखसोबत  तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे.डंकी सिनेमा २१ डिसेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.दरम्यान चित्रपटाचा टिझर पाहल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहचली आहे.

हे ही वाचा : 

मराठा आंदोलनात घुसलेत समाजकंटक, पोलीस झालेत मूक प्रेक्षक. फडणवीसांवर जोरदार टीका

WEDDING INSURANCE| लग्नासाठी पण INSURANCE असतो का?| Is there Insurance for Marriage?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss