Sunday, December 3, 2023

Latest Posts

प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते  ‘हीच माझी दिवाळी’

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनयाच्या शैलीतून  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.दरम्यान प्रार्थनीची लोकप्रियता देखील मोठी आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनयाच्या शैलीतून  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.दरम्यान प्रार्थनीची लोकप्रियता देखील मोठी आहे.प्रार्थनाने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या घराघरात स्थान मिळवलं. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टला पसंती देत असतात.

प्रार्थनाने नुकताच तिचा साडीचा ब्रँड सुरू केला आहे. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. आताही ती चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतच प्रार्थनाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे.  ती पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय जी तिने खास दिवाळीच्या मुहूर्तावर केली आहे. आणि हीच माझी दिवाळी असं म्हणत तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्या घरात चार व्यक्ती बसल्या आहेत आणि त्या कॅरम खेळत आहेत. या चार व्यक्तींना एकत्र पाहून हीच माझी दिवाळी असं तिने लिहिलं आहे. या चार व्यक्ती तिच्या फार जवळच्या आहेत. या व्यक्ती दुसरा तिसऱ्या कुणी नसून तिचे आई- वडील आणि सासू- सासरे आहेत. या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिलं, ‘हीच माझी दिवाळी. माझा खरा आनंद. आई बाबा आणि मम्मी- पप्पा. माझी दिवाळी, माझा आनंद.’ या व्हिडिओमध्ये तिच्या आई आणि सासूबाई एका टीममध्ये आणि बाबा आणि सासरे एका टीम असल्याचं दिसतंय. ते सगळे त्यांच्या अलिबाग येथील फार्महाउसवर दिवाळी साजरी करताना दिसतायत. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

यासोबतच प्रार्थनाने एक स्टोरी पोस्ट करत फटाके न फोडण्याचं आवाहन केलं आहे. आपण फोडलेल्या फटाक्यांमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो, त्यांना इजा होते त्यामुळे तिने सगळ्यांना फटाके न फोडण्याची विनंती केली आहे. प्रार्थना शेवटची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये दिसली होती.दरम्यान आता प्रार्थनाचे चाहते तिच्या पुढील प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा : 

MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी

दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss