Wednesday, February 28, 2024

Latest Posts

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित,कोणत्या कलाकाराकडे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी ?

सध्या मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटाची पर्वणी आपल्याला पाहायला मिळत आहे.दरम्यान प्रेक्षकांचा देखील ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा कल चांगला आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटाची पर्वणी आपल्याला पाहायला मिळत आहे.दरम्यान प्रेक्षकांचा देखील ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा कल चांगला आहे.तर लवकरच आता शिवरायांचा छावा हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन दिग्पाल लांजेकर याने केले आहे,दरम्यान आता प्रेक्षकांना या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,तर नुकतच आता या चित्रपटाच नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.नक्की या भूमिकेत कोणता अभिनेता पाहायला मिळणार आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

दिग्पाल लांजेकरने ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे .पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. त्याचं रौद्र रुप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच त्याच्या मागे एक सिंहदेखील दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”गर्जतो आमच्या देही..रक्त बिंदू रक्त बिंदू…राजे आले आमचे..आले रौद्र शंभू रौद्र शंभू”. या पोस्टवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार?, विशाल निकम, वैभव तत्त्वादी, जय शिवराय, जय शंभूराजे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

शुरवीर,दानशूर अशा शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर कोणता अभिनेता साकारणार हे लवकरच समोर येईल. ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पराक्रमांचे शुरवीरच म्हणावे लागतील. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं  अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल.तर असे शुरवीर असलेले संभाजी महाराजांचा संपुर्ण जीवनकथा मोठ्या पडद्यावर दाखवण्याची धुरा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने सांभाळणार आहेत.दरम्यान आता प्रेक्षक हे ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

Maharashtra Weather, नवीन वर्षात संकट येणार!, पावसाच्या आगमनाने होणार सुरुवात?

शुभमंगल सावधान २०२३ मध्ये ‘या’ मराठी कलाकारांनी बांधली लग्नगाठ  

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss