Saturday, March 2, 2024

Latest Posts

बॉलीवूडच्या भाईजानचे गाजलेल्या चित्रपटांवर एक नजर,जाणुन घेऊयात सलमान खानला मिळालेले पुरस्कार

बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान खान याने आपल्या करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहत आपल्या यशाच्या पायऱ्या चढल्या आहेत.

बॉलीवूडचा भाईजान असलेला सलमान खान याने आपल्या करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहत आपल्या यशाच्या पायऱ्या चढल्या आहेत.अनेक टप्पे आणि चॅलेंजेस पार करत सलमान खान यशस्वी सेलिब्रेटि झाला आहे.जरी या चंदेरी दुनियेत तो लखलखत असला तरी त्याच्या वाटेत देखील अनेक राहु,केतू आलेच असतील याची कल्पना मात्र सर्वसामान्य माणसांना नसते.आताच्या घडीला तो सर्वात महाग आणि आघाडीचा कलाकार आहे.दरम्यान आता सलमान खान कोणत्याही कारणांमुळे चर्चेत येतो,आणि येणारं का नाही म्हणा कारण सध्याचा आघाडीचा कलाकार जो आहे.आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे त्यांनी मनोरंजन विश्वात काम करण्यातच घालवली आहेत. अनेक फिल्म फेअर पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात देखील आलं आहे.आता लवकरच सलमान त्याच्या वयाचा पुढचा टप्पा गाठणार आहे.त्याआधी आपण सलमानचा जीवनप्रवास कसा आहे तो जाणुन घेऊयात.

सलमान खानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असला तरी तो स्वत:ला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समजतो. कारण त्याचे वडील मुस्लिम आणि आई हिंदू आहे. सध्या सलमान खानचे मुंबईत स्वतःचे घर आहे. जेव्हापासून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हापासून तो तिथेच राहत आहे.

बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता होण्यापूर्वी सलमान खानने मॉडेल म्हणून करिअर केले होते. लहानपणी वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावे.मात्र सलमानचा कल हा  अभिनय क्षेत्रातलाच होता.आतापर्यंत सलमानच्या कारकिर्दित अनेक चित्रपट हिट ठरले आहे,त्याच्या करियरमध्ये टर्निंग पॉंइन्ट ठरलेले तेरे नाम हा चित्रपटाने  तर बॉक्स, ऑफिसवर कमाल जादु दाखवली.त्या चित्रपटाने तर तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली होती,अगदी सलमानच्या केसांच्या हेअरस्टाईल तर लक्षवेधी ठरली होती.आजपर्यंत सलमानने अनेक चित्रपट गाजवले आहेत.हम दिल दे चुके सनम,हम साथ साथ है,दबंग,बजरंगी भाईजान,असे अनेक हिट चित्रपट सलमानने आपल्या कारकिर्दित प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहेत.

सलमानने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे सलमान रातोरात सुपरस्टार झाला. या एका चित्रपटामुळे सलमानचा मोठी प्रसिद्धी झोतास आला. आणि त्यानंतर सलमानचा सिनेसृष्टीतला यशस्वी प्रवास सुरुच राहिला त्यात आजतागत खंड पडला नाही.

सलमान खानच्या प्रमुख चित्रपटांमध्ये मैने प्यार किया, साजन, सनम बेवफा, हम आपके है कौन, करण अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या, बीवी नंबर वन, जब प्यार किसीसे होता है, बंधन, दुल्हन हम ले जायेंगे, चल मेरे भाई, हर दिल जो प्यार करेगा, ढाई अक्षर प्रेम के, कहीं प्यार ना हो जाए, चोरी चोरी चुपके चुपके, हम दिल दे चुके सनम, नो एंट्री, पार्टनर, वाँटेड, तेरे नाम, दबंग, रेडी, बॉडीगार्ड, एक था टायगर, टायगर जिंदा है, दबंग-2, किक, बजरंगी भाईजान, राधे आदींचा समावेश आहे.

सलमानला आतापर्यंत 2 राष्ट्रीय पुरस्कार, 2 फिल्मफेअर पुरस्कार, 3 स्क्रीन पुरस्कार, 2 आयफा पुरस्कार, 3 झी सिने पुरस्कार, 3 स्टारडस्ट पुरस्कारसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अभिनयातील त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने मैने प्यार किया, तेरे नाम, बजरंगी भाईजान, सुलतान आणि इतर अनेक चित्रपटांसह अनेक फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत.तर अशा या  बॉलीवूडच्या भाईजानची देशातच नव्हे तर परदेशातही चाहत्यांची संख्या मोठी आहे, यावरूनच लोक सलमानवर किती प्रेम करतात हे दिसून येते. सलमान त्याच्या अनोख्या डान्स मूव्ह, अॅक्शन आणि चित्रपटांमधील ऑफबीट अभिनयासाठी ओळखला जातो. आजही त्याचा फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

 

हे ही वाचा:

Anganewadi च्या भराडी देवीची यात्रेची तारीख ठरली!

ख्रिसमसच्या सुट्टीने प्रभासच्या ‘सालार’ने उचलला फायदा,२५० कोटींपेक्षा अधिकची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss