Sunday, May 19, 2024

Latest Posts

सतत धडपडणाऱ्या काजोलचा व्हिडिओ पाहिलात का?

बॉलीवूडमधील काजोल (kajol Devgan) ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कलाकार आणि त्यांची मुलं कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये ती धडपड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने ५ मे रोजी २०२४ रोजी ‘जागतिक हास्य दिन’ या दिवसाच्या निमित्ताने शेयर केला होता. 

व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना हसवण्याचा प्रयत्न केला आहे. काजोलने व्हिडिओ शेअर करत या सर्व क्लिप पाहिल्यानंतर मला समजलं की मी फोटो, क्लिप करताना आश्चर्यकारकपणे चांगली वागते. तेव्हा चिल करा आणि हा व्हिडिओ पाहा, कॅप्शनमध्ये तिने असे लिहले आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी कमेंट आणि लाइक केले आहे. या व्हिडिओवर डिझायनर मनीष मल्होत्राने कमेंट केली आहे. मला आठवते की, तू मॉरिशमध्ये कशी पडली होती ते आणि नंतर आम्हाला तुझ्याकडे लगेच धावत यावं लागलं होत. नंतर आपण खूप हसलो होतो. ”कुछ कुछ होता है” या चित्रपटाच्या पण खूप आठवणी आहेत. तुझ्यावर खूप प्रेम असेही त्यांनी लिहले आहे.

क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेता अभय देओल यांनी पण काजोलच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. काजोलने गेल्यावर्षी ओटीटीवर पदार्पण केले आहे. ‘लस्ट स्टोरी २’ या चित्रपटातून ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. ‘द ट्रायल’ या वेब सिरीजमध्ये पण तिने काम केले होते. तिचे चाहते तिच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत असतात.  

हे ही वाचा:

Vijay Wadettiwar यांच्या वक्तव्यावरून BJP आक्रमक, नागपुरात पुतळा दहन करून केला निषेध व्यक्त Ajit Pawar यांनी रडण्याची ऍक्टिंग करून उडवली खिल्ली, Rohit Pawar यांनी दिले प्रत्युत्तर, तुमच्यासारखे मगरीचे नरकाश्रू नाहीत! Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss