Sunday, May 19, 2024

Latest Posts

Ajit Pawar यांनी रडण्याची ऍक्टिंग करून उडवली खिल्ली, Rohit Pawar यांनी दिले प्रत्युत्तर, तुमच्यासारखे मगरीचे नरकाश्रू नाहीत!

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP) बारामती लोकसभा मतदारसंघात रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी सभेत बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांची रडण्याची नक्कल करून त्यांची खिल्ली उडवली. मी तुम्हाला सांगितलं होतं कि शेवटच्या दिवशी तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल, एका पट्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, मीपण दाखवतो मग मलापण मतदाण द्या, असे वक्तव्य करत त्यांनी रोहित पवारांना टोला मारला. आता यावर रोहित पवार यांनीही ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

काल (रविवार, ५ मे) बारामती येथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. याच घटनेचा दाखला देत अजित पवार यांनी महायुतीच्या सभेत रोहित पवार यांची नक्कल केली. रोहित पवार यांचा रडण्याचा व्हिडीओ दाखवत अजित पवार म्हणाले, “या माच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं मग मी पण दखवतो. असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत,” असे ते यावेळी म्हणाले.

यावर आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत ते म्हणाले, “अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा…. आणि हो… वडलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही.”

तसेच अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यावरदेखील टीका केली होती. ‘काही जण तर कधी कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, अरे कुस्तीचा डाव माहित आहे का बेटा? असा सवाल अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना विचारला होता. यावर प्रत्युत्तर देत रोहित पवार म्हणाले, “अजितदादा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरुनही तुम्ही साहेबांवर टीका केली, पण अजितदादा तुम्हीही ऑलिम्पिक, खो-खो आणि कबड्डी संघटनेवर काम केलं.. पण कुठं ऑलिम्पिक स्पर्धेला किंवा कुठल्या तालुक्याच्या खो-खो किंवा कबड्डी स्पर्धेतही आपण खेळल्याचं कधी दिसलं नाही… पण ईडीची नोटीस आल्यावर ‘पळणारे’ अजितदादा मात्र सर्वांनी पाहिले.” अश्या कडक शब्दांत रोहित पवार यांनी अजित पवारांवर ताशेरे ओढले.

हे ही वाचा:

BJP काम करो अथवा न करो,आम्ही… Gulabrao Patil यांचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray हे Sharad Pawar यांच्या नादी लागुन रावणराज्य आणायला चाललेत, Sadabhau Khot यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss