मागील काही महिन्यांपासून दर महिन्यांच्या १ तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती, बँक या सगळ्या गोष्टींच्या नियमांमध्ये बदल केले जातात. त्यानुसार येणाऱ्या १ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून (NPS) पैसे काढण्यासाठी आता नियम लागू होणार आहेत. या योजनेसंदर्भातील नियम बदलणार आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून (NPS) पैसे काढण्याचे नियम १ फेब्रुवारी २०२४ पासून बदलले जाणार आहेत. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने या नियमांमध्ये बदल केला आहे. पीएफआरडीएने (PFRDA) याबाबत अधिसूचना दिल्या आहेत. नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमांनुसर १ फेब्रुवारी २०२४ पासून, खातेदाराला जमा रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा नियम फेब्रुवारीपासून लागू केला जाणार आहे. पण सध्या या नियमांची अंमलबजावणी झालेली नाही. १ फेब्रुवारीपासून हा नियम लागू होणार आहे.
NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.जर तुमचे NPS खाते ३ वर्षे जुने असेल तरच तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. खात्यामध्ये ठेवलेल्या एकूण ठेव रकमेच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही.खातेदार फक्त 3 वेळा पैसे काढू शकतो.NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी, पैसे काढण्याची विनंती दाखल करावी लागते.त्यानंतर खातेदाराला पैसे काढण्याचे कारण द्यावे लागेल. तसेच त्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.पैसे काढण्याची विनंती सबमिट केल्यानंतर, सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी या अर्जावर प्रक्रिया करते.पैसे काढण्याच्या विनंतीवर प्रक्रिया केल्यानंतर काही दिवसांनी खात्यात पैसे जमा होतात.
हे ही वाचा:
भंडाऱ्यातील आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात एकाचा मृत्यू
‘मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच’…आरक्षण मिळाल्यानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट