Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील’….किरण मानेनी पोस्ट शेअर करत पुष्करला खडेबोल सुनवलं

बिग बॉस मराठी कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतास आलेला अभिनेता पुष्कर जोगने केलेल्या एका सर्व्हेबाबतच्या पोस्टमुळे तो  अडचणीत सापडला आहे.

बिग बॉस मराठी कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतास आलेला अभिनेता पुष्कर जोगने केलेल्या एका सर्व्हेबाबतच्या पोस्टमुळे तो  अडचणीत सापडला आहे.या पोस्टमध्ये त्याने बीएमसीच्या एका कर्मचाऱ्याला अपशब्द वापरले आहेत.या पोस्टमध्ये पुष्करनं लिहिलं की, बीएमसीचे काही कर्मचारी त्याच्या घरी आले होते आणि  सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. पुष्करनं पोस्टमध्ये असंही लिहिलं की, “त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या, तर २ लाथा  अशताच आता किरण माने यांनी पुष्करची चांगलीच कानउघडणी केली आहे.किरण मानेंनी देखील पोस्ट करत त्याला आव्हान दिले आहे.

किरण माने यांनी फेसबुरवर पोस्ट शेअर केरत लिहिलं की, “आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय.’आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.” अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे.”

पुढे किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “तुला लाथाच घालायच्यात ना? लय राग आलाय का तुला जात विचारल्याचा? मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुलं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनाव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनावाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू?  हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लय महागात पडेल. मापात रहा.”अशा पद्धतीने किरण मानेंनी पोस्ट करत त्याला खडेबोल सुनवलं आहे.

काही दिवसांपूर्वी पुष्करनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, ‘काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या, तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या.कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणारयावर आता किरण मानेंनी पुष्करला चांगलेच बोल लावले आहेत.आता यावर पुष्कर काय प्रतिक्रिया देणार यावर लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावचं लागेल – DEVENDRA FADNAVIS

मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम – चंद्रशेखर बावनकुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss