Saturday, March 2, 2024

Latest Posts

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार अनेक जबरदस्त वेबसिरीज,घर बसल्या पाहयला मिळणार मनोरंजनाचा तडका

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार अनेक जबरदस्त वेबसिरीज,घर बसल्या पाहयला मिळणार मनोरंजनाचा तडका

सिनेसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं आहे.दरम्यान या वर्षात विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमा  आणि वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आले आहेत.या वेबसिरीजने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाचा तडका पाहायला मिळाला आहे.आता २०२४ मध्ये नवीन काय पाहयला मिळणार यासाठी प्रेक्षक उस्तुक आहेत.२०२४ मध्येदेखील अनेक जबरदस्त चित्रपट आणि वेबसिरीज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.चला तर मग जाणुन घेऊयात २०२४मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिरीज

 मिर्जापूर 3 : ‘मिर्जापूर 3’ या सिरीजसाठी प्रेक्षक अतिशय उस्तुक आहेत. ‘मिर्जापूर 3’मध्ये कालीन भैया आणि गुड्डू भेयामधील भांडण पाहायला मिळणार आहे. कालीन भैयाचं दमदार कमबॅक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल.मिर्जापूरच्या आधिच्या भागांना देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. 

 आश्रम 4  : आश्रम 4 या बहुचर्चित सीरिजचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पुढल्या वर्षात ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. आतापर्यंत तीन सीझन हिट झाले आहेत. त्यामुळे चौथा सीझनदेखील सुपरहिट होऊ शकतो.दरम्यान आता प्रेक्षक देखील ही सिरीज प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

 द फॅमिली मॅन 3: ‘द फॅमिली मॅन 3’ या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कोरोनाकाळावर आधारित ही सीरिज दाखवण्यात येत असल्याची शक्यता आहे.

पंचायत 3 : ‘पंचायत 3’ ही सीरिज नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सीरिजचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.आणि लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

असुर 3  : असुर 2 च्या रोमांचक कथेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

इंडियन पोलीस फोर्स: इंडियन पोलीस फोर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीचा हा शो 19 जानेवारी 2024 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

किलर सूप : मनोज वाजपेयीची किलर सूप ही सीरिज 11 जानेवारी 2024 पासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात. 

दरम्यान वेबसिरीज प्रेमीना नवनव्या वेब सिरीज पाहायला आवडत असल्यामुळे या प्रेक्षक वर्गामध्ये नवी वेब सिरीज प्रदर्शित होण्याबाबतची उस्तुकत्ता अधिक असते.

हे ही वाचा:

भाजपच्या नेत्याने केला मोठा दावा, Raj Thackeray यांना निमंत्रण कारण ते VVIP, तर Uddhav Thackeray केवळ…

‘बिग बॉस१७’च्या घरात अंकिता करतेय सुशांतबाबतीतला एक खुलासा ,दुसऱ्यासोबत रोमान्स करताना पाहून मला अश्रू अनावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss