अरे बापरे!, Uorfi Javed ने तर बनवला टी बॅगपासून ड्रेस

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा नवीन पोशाख दाखवला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की उर्फीने तिच्या ड्रेससाठी कोणती गोष्ट वापरली आहे. यावेळी उर्फीने टी बॅगमधून वन पीस आउटफिट तयार केला आहे.

अरे बापरे!, Uorfi Javed ने तर बनवला टी बॅगपासून ड्रेस

मॉडेल आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) कधी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे उर्फी बऱ्याच वेळा ट्रॉल होत असते. उर्फी कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. उर्फी जावेद म्हंटल कि अनोखे ड्रेस हे आलेच यात आता काही नवल राहील नाही परंतु उर्फी आणखी किती वेगवेगळे आणि विचित्र डिझाइन्सचे ड्रेस बनवू शकते, असा प्रश्न नेटकऱ्यांना नेहमीच पडत असतो. ती दररोज नव्या आऊटफिटने सर्वांना चकीत करते. कधी ती सेफ्टी पिन ड्रेस घालून बाहेर पडते तर कधी च्युइंगम टॉप घालून फोटोशूट करते. कधी ती विजेच्या तारांनी तिचा पोशाख तयार करते तर कधी ती कचऱ्याच्या पिशव्या बनवते. आता उर्फी जावेदने तिच्या रंगीबेरंगी पोशाखांच्या यादीत आणखी एका ड्रेसचा समावेश केला आहे. तिने नुकताच एक नवीन आऊटफिटचा व्हिडिओ हा शेअर केला आहे.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा नवीन पोशाख दाखवला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की उर्फीने तिच्या ड्रेससाठी कोणती गोष्ट वापरली आहे. यावेळी उर्फीने टी बॅगमधून वन पीस आउटफिट तयार केला आहे. उर्फीच्या व्हिडीओमध्ये ती पहिल्यांदा आरामात चहा पिते आणि मगच तिची नजर कपात बुडवलेल्या चहाच्या पिशवीवर पडते. तेवढ्यात उर्फी तिचा नवीन ड्रेस घालून समोर येते.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात

बार्क इंडियाच्या रिपोर्टनुसार Rupali Ganguly ची अनुपमा अव्वल स्थानावर

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version