वाईट अवस्थेत असलेल्या शाळेची केली पंकज त्रिपाठींनी कायापालट

चित्रपट विश्वामध्ये अनेक स्टार आहेत त्यांनी त्याचे गाव सोडून मुंबईच्या मायानगरीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आता हे कलाकार इतके प्रसिद्ध झाले आहेत की प्रेक्षक त्यांच्या आवाजावरून सुद्धा त्यांना ओळखतात.

वाईट अवस्थेत असलेल्या शाळेची केली पंकज त्रिपाठींनी कायापालट

चित्रपट विश्वामध्ये अनेक स्टार आहेत त्यांनी त्याचे गाव सोडून मुंबईच्या मायानगरीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. आता हे कलाकार इतके प्रसिद्ध झाले आहेत की प्रेक्षक त्यांच्या आवाजावरून सुद्धा त्यांना ओळखतात. त्याचबरोबर त्यांनी साकारलेल्या भूमिकावर त्यांना ओळखले जाते. त्यामधीलच एक कलाकार म्हणजेच पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi). पंकज त्रिपाठी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९७६ रोजी बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी ते आहेत. पंकज यांचे प्राथमिक शिक्षण हे गावामधील एका शाळेत झाले होते. या शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापकांनी पंकज यांच्याशी संवाद साधला त्यांनी लगेच पंकज यांनी त्यांना होकार दिला.

पंकज त्रिपाठी यांचे प्रमुख मत आहे की,, मुलांच्या विकासासाठी शिक्षणाची भूमिका ही सर्वात महत्वाची आहे. अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्याशी संवाद साधला. शाळेचे कंपाउंड शाळेचा गेट बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेच्या बाहेर रस्ता असल्यामुळे शाळेमधील मुले खेळताना रस्त्यावर जातात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. या परिस्थितीत मदत करणे हे माझं कर्तव्य आहे असे मला वाटले मी या शाळेमध्ये शिकलो होतो त्यामुळे माझा ही या शाळेशी संबंध आहे. असे पंकज त्रिपाठी म्हणाले.

पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, जेव्हा मी गावातील शाळेला बेत दिली त्यावेळी तेव्हा तिची अवस्था अतिशय खराब होती. त्या शाळेचे प्लॅस्टर पडत होते, रंग उतरला होता, पंखे चालत नव्हते. पंकजने आपल्या भावाच्या मदतीने एक प्रकल्प तयार केला आणि पैशाची व्यवस्था करून शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. ज्या शाळेत एकेकाळी पंकज यांनी शिक्षण घेतले त्या शाळेची स्थिती सुधारत कायापालट केला आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version