‘एनसीपीए’च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी जपणार मराठी कलासंस्कृती

प्लॅनेट मराठीने दि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)सोबत असोसिएट होऊन 'प्रतिबिंब - मराठी नाट्य उत्सव २०२३' हा उत्सव नुकताच राबवला.

‘एनसीपीए’च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी जपणार मराठी कलासंस्कृती

प्लॅनेट मराठीने दि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए)सोबत असोसिएट होऊन ‘प्रतिबिंब – मराठी नाट्य उत्सव २०२३’ हा उत्सव नुकताच राबवला. या उत्सवात नाटकं, वाचन, कॅम्पस टूर, नाट्य तज्ज्ञांसोबत बातचीत, कार्यशाळा यांचा समावेश होता. अनेक मान्यवरांची उपस्थितीही यावेळी लाभली. मुळात एनसीपीए ही अशी संस्था आहे, जिथे भारतीय कला, संस्कृती जोपासली जाते. त्याचे जतन केले जाते. हीच कला अधिकाधिक मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोवण्याच्या उद्देशानेच या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

‘प्रतिबिंब’च्या माध्यमातून यावेळी रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, अमृता सुभाष, प्रतिमा कुलकर्णी, अनिता दाते, मुग्धा गोडबोले, सायली पाठक, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, कादंबरी कदम यांच्यासह अनेक नामवंतांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या ज्या आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाल्या आहेत. पहिल्या तीन मुलाखती प्रदर्शित झाल्या असून या कलावंतांनी आपला प्रवास, ‘एनसीपीए’शी जोडल्या गेलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, काही गंमतीदार किस्से, नाटकाचा इतिहास अशा थिएटर संबंधित अनेक गोष्टी या शेअर करण्यात आल्या आहेत आणि त्यांना बोलतं केलं आहे निवेदक श्रवण यांनी.

या उत्सवाबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, आम्हाला आनंद आहे की, ‘’कलेला प्रोत्साहन देणाऱ्या मुंबईतील एनसीपीए सारख्या संस्थेशी आम्ही जोडले आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदाच प्लॅनेट अशा प्रकारचा शो करत आहेत. मला खात्री आहे, हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. लवकरच इतर मुलाखतीही प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर प्रदर्शित होतील. मराठी कलेला ग्लोबली पोहोचवण्याचा यापुढेही आमचा प्रयत्न असेल.’’

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version