Tuesday, April 23, 2024

Latest Posts

प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख,व्हिडिओ पोस्ट करत मागितली माफी

राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त देशभरात ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अशाच एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला.तिच्याकडून झालेल्या या चूकीमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.तिने केलेल्या चूकीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे शिवप्रेमींकडून प्रार्थनावर रोष व्यक्त होत आहे.अखेर याप्रकरणी प्रार्थनाला माफी मागावी लागली आहे.

लातूरच्या उदगीर येथील एका मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दाखल झाली होती. त्यावेळी उद्घाटनादरम्यान शुभेच्छा देताना सलग चार ते पाचवेळा तिने महाराजांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. त्यामुळे लातूरमधील शिवभक्तांकडून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच अभिनेत्रीच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरदेखील फाडण्यात आले आहेत. तसेच प्रार्थनाने आता माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी उदगीर शहरामध्ये अभिनेत्रीचे लागलेले बॅनर फाडत संताप व्यक्त केला. अभिनेत्रीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने नवा व्हिडीओ बनवून शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

प्रार्थना बेहेरे म्हणाली आहे,”आज मी उदगीर येथे किसान मॉलच्या उद्घाटनाला आले होते. तिथे आल्यावर माझ्याकडून चुकून काही बोलण्यात आले असेल तर त्या बद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते. कृपा करून मला माफ करा, माझा त्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नव्हता. मी परत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय”. असे प्रार्थनाने तिच्या या माफीनाम्यात म्हटले आहे. दरम्यान प्रार्थनाची ही एक चूक तिला चांगलीच भावली आहे .

हे ही वाचा: 

अनुपमा मालिकेतील अभिनेते ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचे असेल तर वेगळा कायदा का? छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss