Saturday, July 27, 2024

Latest Posts

५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यायचे असेल तर वेगळा कायदा का? छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभरात चांगलाच चर्चेत आहे.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभरात चांगलाच चर्चेत आहे. आरक्षणाचा मुद्दा आता विधिमंडळात जाऊन पोहचला आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या मागणीवरून काही दिवसांपासून अनेक वाद सुरु आहेत. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ हा वाद सध्या चागंलाच चर्चेत आहे. आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगेसोयरेविरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आल्या आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षण टिकण्यासाठी बील तयार करण्यात आले आहे. यावर अनके माजी न्यायमूर्तीनी लक्ष घातले आहे. सगेसोयरे विरोधात साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आला आहेत. समता परिषद ओबीसी संघटनांचे मी अभिनंदन करतो, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. बाठिया आयोगाने केलेली जनगणना असेल किंवा सध्याच्या शुक्रे कमिशनने केलेली जनगणना असेल, या कुठल्याच आयोगाची जनगणना आम्ही मान्य करत नाही. तुम्हाला खरंच कुठला समाज किती आहे याचे आकडे हवे असतील, तर जातीय जनगणना करा, असे भुजबळ म्हणाले. जर ५० टक्केच्या आतमध्ये आरक्षण द्याचे आहे तर वेगळा कायदा करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. गायकवाड आयोगाचे आरक्षण आरक्षण उच्च न्यायालयात टिकले आहे. आता त्याचा विचार केला जाणार आहे. सगळ्यांना कायदावर बोलायला दिले गेले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.

दोन तीन लोकांना मिळून मराठा समाजाचे वाटोळे करायचे आहे. याआधी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात आले होते. त्यानंतर नोकरीसाठी मराठी तरुणांची निवड करण्यात आली होती, पण त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. या तरुणांच्या हातामध्ये आता पेन हवा होता, पण त्यांच्या हातामध्ये आंदोलनाचे हत्यार आहे. आता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे. मराठा आरक्षण टिकले नाही तर तेच होणार आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसींमधून आमचे आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss