Sunday, May 19, 2024

Latest Posts

महाराष्टाचा लाडक्या जोडीने पण बजावला मतदानाचा हक्क

बॉलीवूड अभिनेत रितेश देशमुख (Ritesh Deshmukh ) आणि जेनिलिया डिसुझा-देशमुख (Genelia D’souza) चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच चर्चेत असतात. आज देशभरात तिसऱ्या टप्याचे मतदान होत आहे. त्यामुळे या दोघांनी लातूरमधील बाबुळगाव येथे जाऊन मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर रितेशने ट्विटरवर फोटो टाकत याची माहिती दिली. या फोटोमध्ये रितेश, जेनेलिया आणि रितेशची आई वैशाली देशमुख ( Vaishali Deshmukh) यासुद्धा दिसत आहे.

आज लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या टप्प्यात ९४ मतदारसंघ आहेत. १० राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडत आहे. तर महाराष्ट्रात अकरा जागांवर मतदान पार पडत आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया दोघेही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आले होते.  रितेश आणि जेनेलियाने पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करून मतदान केले. जेनेलियाने पिवळ्या रंगाची साडी नेसून आणि रितेशने सफेद कुर्ता घातला होता. दोघेही खूप सुंदर दिसत होते. सेलिब्रिटी असल्याचं न दाखवता रांगेत उभे राहून मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर रितेश आणि जेनेलिया यावेळी दोघांनी जनतेला मतदान नक्की करा अशी  जनजागृती केली. ‘आज हा दिवस महत्वाचा आहे’. असे जेनेलिया मिडियासोबत बोलतात म्हणाली आहे. ‘मी मतदान करण्यासाठी मुंबईहुन लातूरमध्ये आलो आहे. त्यामुळे सर्वानी घरातून बाहेर जाऊन मतदान करा’ असे देखील रितेशने सांगितले आहे.

रितेश देशमुखचे लवकरच मस्ती ४, विस्फोट, ककुडा, हाऊसफूल ५ हे चित्रपट येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ”राजा शिवाजी” या चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगणसोबत ‘रेड २’ आणि अमीर खानच्या ‘सितारे जमीन पार’ या आगामी चित्रपटामध्ये जेनेलिया देशमुख दिसणार आहे.

 

हे ही वाचा:

आजारपणानंतर Sheyasचे Comeback, नवा चित्रपट घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Body Shaming बद्दल काय म्हणाली Sonali?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss